माउंट माउनगुई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना उद्या (मंगळवार) माउंट माउनगुईच्या मैदानात खेळला जाणार आहे. भारताने यापूर्वीच ही मालिका ०-२ अशी गमावली असली, तरी अखेरचा सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्यासाठी भारताचा संघ उत्सूक असेल. दुसरीकडे टी-२० मालिकेच्या व्हाईटवॉशची परतफेड न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेत करू इच्छित आहे. यामुळे हा सामना रोमांचक होईल, अशी आपेक्षा आहे. दरम्यान, भारतीय संघासाठी माउंट माउनगुईचे मैदानात 'लकी' आहे.
असा आहे भारताचा माउंट माउनगुई मैदानावरील रेकॉर्ड -
भारताने आतापर्यंत माउंट माउनगुई मैदानात २ सामने खेळले आहेत. भारताने या दोनही सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला आहे. उभय संघात याआधी २८ जानेवारी २०१९ मध्ये सामना झाला होता. या सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवला होता.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना हॅमिल्टनमध्ये खेळवण्यात आला. न्यूझीलंडने हा सामना ४ गडी राखून जिंकला. त्यानंतर दुसरा सामना ऑकलंडमध्ये झाला. या सामन्यात भारतीय संघ २२ धावांनी पराभूत झाला.
मालिकेत टॉप खेळाडू -
मालिकेतील खेळाडूंच्या कामगिरीविषयी सांगायचे झाल्यास, फलंदाजीत रॉस टेलरने सर्वाधिक १८२ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर १५५ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीत टिम साऊदी सर्वाधिक ४ गडी बाद टिपले आहेत. तर शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल प्रत्येकी ३-३ गडी बाद करुन संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.
हेड-टू-हेड
भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत १०९ वेळा समोरासमोर आले आहेत. यात भारताने ५५ तर न्यूझीलंडने ४८ सामने जिंकली आहेत. एक सामना अनिर्णीत राहिला तर ५ सामन्याचा निकाल लागू शकला नाही. मालिकाचा विचार केल्यास आतापर्यंतच्या १४ पैकी ८ मालिका भारताने जिंकल्या आहेत. तर ४ वेळा न्यूझीलंड विजयी ठरला. २ मालिका बरोबरीत सुटल्या आहेत.
हेही वाचा - VIDEO : क्रिकेटला गालबोट, अंतिम सामन्यानंतर भारत-बांगलादेशचे खेळाडू भिडले
हेही वाचा - आयसीसीचा नवा नियम : भारत, इंग्लंडसह ऑस्ट्रेलियाला बसणार फटका?