अहमदाबाद - चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यांची सुरूवात खराब झाली. पहिल्या सत्रामध्येच इंग्लंडचे तीन फलंदाज बाद झाले. पहिल्यांदा फिरकीपटू अक्षर पटेलने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडलं. त्यानंतर मोहम्मद सिराजने कर्णधार जो रुटला बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या जोडीने उपहारापर्यंत नाबाद ४४ धावांची भागिदारी करत पडझड रोखली. इंग्लंडने उपहारापर्यंत ३ बाद ७४ धावा केल्या आहेत.
-
Lunch in Ahmedabad 🍲
— ICC (@ICC) March 4, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
India made a quick start, reducing England to 30/3, but Bairstow and Stokes have taken them to the break at 74/3.
Who did that session belong to? 🤔#INDvENG ➡️ https://t.co/6OuUwURcgX pic.twitter.com/Rl1km6NrQ3
">Lunch in Ahmedabad 🍲
— ICC (@ICC) March 4, 2021
India made a quick start, reducing England to 30/3, but Bairstow and Stokes have taken them to the break at 74/3.
Who did that session belong to? 🤔#INDvENG ➡️ https://t.co/6OuUwURcgX pic.twitter.com/Rl1km6NrQ3Lunch in Ahmedabad 🍲
— ICC (@ICC) March 4, 2021
India made a quick start, reducing England to 30/3, but Bairstow and Stokes have taken them to the break at 74/3.
Who did that session belong to? 🤔#INDvENG ➡️ https://t.co/6OuUwURcgX pic.twitter.com/Rl1km6NrQ3
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उभय संघातील चौथा सामना रंगला आहे. अक्षर पटेल याने आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्ले (२) याला त्रिफळाचीत केले. सिब्लेच्या पाठोपाठ अक्षरने जॅक क्राउली याला बाद केले. त्याने क्राउलीला सिराजकडे झेल देण्यास भाग पाडले. क्रॉउलीने ९ धावा केल्या. त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सिराजने रुटला पाच धावांवर पायचीत करत इंग्लंडला जबर धक्का दिला. तेव्हा इंग्लंडची अवस्था ३ बाद ३० अशी झाली.
जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या जोडीने चिवट खेळी करत पडझड रोखली. उपहारापर्यंत इंग्लंडने ३ बाद ७४ धावा केल्या आहेत. स्टोक्स २४ तर बेअरस्टो २८ धावांवर खेळत आहेत. भारताने चौथ्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली आहे. तर, इंग्लंडचा संघ तीन गोलंदाजांसह मैदानात उतरला असून जोफ्रा आर्चर आणि स्टुर्अट ब्रॉडला संघात जागा मिळालेली नाही. फलंदाजी भक्कम करण्यासाठी इंग्लंडने डॅनियल लॉरेन्सला संघात स्थान दिले, तर फिरकीपटू डोमिनिक बेस यालाही अखेरच्या कसोटीत संधी मिळाली आहे.
- इंग्लंडचा संघ -
- डॉम सिब्ली, जॅक क्राऊली, जॉनी बेअरस्टो, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ऑली पोप, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, डॉम बेस, जॅक लिच आणि जिमी अँडरसन.
- भारतीय संघ -
- रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर अश्विन, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज.