अहमदाबाद - भारतीय संघाने तिसरा कसोटी सामना १० गडी राखून जिंकत चार सामन्याच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे एक पाऊल टाकलं आहे.
-
India win 🎉
— ICC (@ICC) February 25, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
They have taken a 2-1 lead in the Test series after defeating England by 10 wickets in Ahmedabad.#INDvENG ➡️ https://t.co/0unCGV6iLi pic.twitter.com/qK1SLJA3x4
">India win 🎉
— ICC (@ICC) February 25, 2021
They have taken a 2-1 lead in the Test series after defeating England by 10 wickets in Ahmedabad.#INDvENG ➡️ https://t.co/0unCGV6iLi pic.twitter.com/qK1SLJA3x4India win 🎉
— ICC (@ICC) February 25, 2021
They have taken a 2-1 lead in the Test series after defeating England by 10 wickets in Ahmedabad.#INDvENG ➡️ https://t.co/0unCGV6iLi pic.twitter.com/qK1SLJA3x4
इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला. त्यानंतर लीच-रुट यांच्या फिरकी माऱ्यासमोर भारताचा डाव गडगडला आणि भारतीय संघ पहिल्या डावात १४५ धावांपर्यंत मजल मारू शकला. तेव्हा दुसऱ्या डावातही इंग्लंडचा संघ भारतीय फिरकीसमोर ढेपाळला. अश्विन-अक्षर जोडीने इंग्लंडला ८१ धावांत गुंडाळले आणि भारताला विजयासाठी ४९ धावांचे आव्हान मिळाले होते. तेव्हा रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी नाबाद राहत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
तिसऱ्या कसोटी सामन्यात अक्षर पटेलने ११, अश्विन याने ७ आणि वॉशिंगटन सुंदर आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला. रोहित शर्माने पहिल्या डावात महत्वपूर्ण ६६ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात तो २५ धावांवर नाबाद राहिला.
इंग्लंडच्या संघाने विजयासाठी दिलेले अवघ्या ४९ धावांचे आव्हान भारताने एकही गडी न गमावता पार केले. दुसऱ्या डावात रोहित शर्माने २५ धावांची खेळी केली. तर गिलने १५ धावा केल्या. रोहितने षटकार ठोकत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुसऱ्या डावांत इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. बेन स्टोक्सने इंग्लंडकडून सर्वाधिक २५ धावा केल्या. त्याखालोखाल कर्णधार जो रुटने १९ धावा केल्या. इंग्लंडच्या चार फलंदाजांना खातेही उघडता आलं नाही. तर फक्त तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या ओलांडता आली. अक्षर पटेलला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. उभय संघातील अखेरच्या कसोटी सामन्याला ४ मार्चपासून सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - NZ vs AUS २nd T-२०: ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव, न्यूझीलंडची २-० ने आघाडी
हेही वाचा - अश्विनने रचला इतिहास, सर्वात जलद ४०० विकेट घेणारा भारतातील पहिला आणि जगातील दुसरा खेळाडू