पुणे - भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून पुण्यात सुरूवात झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात कृणाल पांड्या व प्रसिद्ध कृष्णा यांना पदार्पणाची संधी दिली आहे. तसेच युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळाली आहे. तर ऋषभ पंतला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी लोकेश राहुलचा समावेश संघात आहे.
दरम्यान, इंग्लंडने कसोटी आणि टी-२० मालिकेत विजयाने सुरुवात केली होती. पण या दोन्ही स्वरूपात त्यांना लय कायम राखण्यात अपयश आले. एकदिवसीय मालिकेत इंग्लंड कशी कामगिरी करणार याकडे लक्ष्य आहे. दुसरीकडे भारतीय संघ सुसाट फॉर्मात असून एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील आहे.
भारतीय संघ -
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंडचा संघ -
जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, इयॉन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम बिलिंग्स, मोईन अली, सॅम कुरेन, टॉम कुरेन, आदिल राशिद आणि मार्क वूड.
हेही वाचा - Ind vs Eng ODI Series : भारत-इंग्लंड १०० वेळा आमनेसामने, कोण ठरलं वरचढ
हेही वाचा - इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे भारताचे टॉप-३ फलंदाज, पहिला तर आहे खास