ETV Bharat / sports

हिटमॅन रोहितचा अनोखा विक्रम, दोन मालिकेत खेळणार तीन रंगांच्या चेंडूनं - भारत विरुध्द बांगलादेश कसोटी मालिका

बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेत रोहित शर्मा पांढऱ्या चेंडूने खेळला. आता तो बांगलादेश विरुध्द दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना इंदूरच्या होळकर मैदानावर लाल चेंडूने होणार आहे तर दुसरा ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना गुलाबी चेंडूने कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. यामुळे एकाच महिन्यात एकाच संघाविरुद्धच्या दोन आंतरराष्ट्रीय मालिकामध्ये  ३ वेगवेगळ्या रंगाच्या चेंडूने खेळण्याची आगळी 'हॅट्ट्रिक' रोहित साकारणार आहे.

हिटमॅन रोहितचा अनोखा विक्रम, दोन मालिकेत खेळणार तीन रंगांच्या चेंडूनं
author img

By

Published : Nov 13, 2019, 3:16 PM IST

नवी दिल्ली - बांगलादेशविरुध्दच्या सुरू असलेल्या दौऱ्यात भारताचा सलामीवीर 'हिटमॅन' रोहित शर्मा एक आगळावेगळ्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. तो विक्रम म्हणजे, एकाच दौऱ्यातील दोन मालिकामध्ये एकाच महिन्यात पांढरा, लाल आणि गुलाबी अशा तीन रंगांच्या वेगवेगळ्या चेंडूने खेळण्याचा. या दौऱ्यात कोलकाताच्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी लढतीत गुलाबी चेंडू प्रथमच वापरला जाणार आहे. या लढतीत रोहित खेळल्यास तो असा पराक्रम करणारा भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरेल.

बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेत रोहित शर्मा पांढऱ्या चेंडूने खेळला. आता तो बांगलादेश विरुध्द दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना इंदूरच्या होळकर मैदानावर लाल चेंडूने होणार आहे तर दुसरा ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना गुलाबी चेंडूने कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. यामुळे एकाच महिन्यात एकाच संघाविरुद्धच्या दोन आंतरराष्ट्रीय मालिकामध्ये ३ वेगवेगळ्या रंगाच्या चेंडूने खेळण्याची आगळी 'हॅट्ट्रिक' रोहित साकारणार आहे.

दरम्यान, टी-२० मालिकेत खेळलेले बांगलादेशचे लिटन दास, महमुदुल्लाह, मुश्फिकूर रहिम, मोहम्मद मिथुन, मुस्तफिजूर रहमान, अमिनुल इस्लाम आणि मोसाददेक हुसेन हे खेळाडूही दिवस-रात्र कसोटी खेळल्यास रोहितसारखाच पराक्रम करण्याच्या उंबरठ्य़ावर आहेत. कारण तेही टी-२० मालिकेत पांढऱ्या चेंडूने खेळले आहेत.

भारतीय संघाचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना -
आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत कोलकाता येथे भारत आणि बांगलादेश संघात भारतातील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना २२ ते २६ नोव्हेंबर या दरम्यान खेळला जाणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, या ऐतिहासिक सामन्याला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

हेही वाचा - टीम इंडिया इंदूरच्या होळकर स्टेडियमवर आहे अपराजित

हेही वाचा - आयसीसीच्या क्रमवारीत कोहली-बुमराहचे राज्य, तर शाकिबला मोठा 'धक्का'

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.