ETV Bharat / sports

अरे हे काय.. टी-२० दीपक चहरने नव्हे तर 'या' खेळाडूने घेतली पहिली 'हॅट्ट्रीक' - ekta bisht take first t20 hat trick

टी-२० मध्ये दीपक चहरने नाही तर एकता बिष्टने  भारतासाठी पहिली हॅट्ट्रिक साधली आहे. दीपक चहरने बांगलादेश विरुध्दच्या निर्णायक सामन्यात हॅट्ट्रिकसह ६ गडी बाद केले होते. तेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन चहर टी-२० मध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला असल्याचे ट्विट केले. यानंतर मात्र,  नेटीझन्ससह अखिल भारतीय महिला काँग्रेसने बीसीसीआयला धारेवर धरले.

अरे हे काय.. टी-२० दीपक चहरने नव्हे तर 'या' खेळाडूने घेतली पहिली 'हॅट्ट्रीक'
author img

By

Published : Nov 12, 2019, 10:28 AM IST

Updated : Nov 12, 2019, 10:38 AM IST

नवी दिल्ली - टी-२० मध्ये दीपक चहरने नाही तर एकता बिष्टने भारतासाठी पहिली हॅट्ट्रिक साधली आहे. दीपक चहरने बांगलादेश विरुध्दच्या निर्णायक सामन्यात हॅट्ट्रिकसह ६ गडी बाद केले होते. तेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन चहर टी-२० मध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला असल्याचे ट्विट केले. यानंतर मात्र, नेटीझन्ससह अखिल भारतीय महिला काँग्रेसने बीसीसीआयला धारेवर धरले.

बीसीसीआयच्या त्या ट्वीटनंतर अखिल भारतीय महिला काँग्रेससह ट्विटर यूजर्संनी चाहरच्या आधी आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात एकता बिष्टने हॅटट्रिक घेतली होती असे खडेबोल सुनावले.

बीसीसीआयच्या ट्विटवर अखिल भारतीय महिला काँग्रेसने रिट्विट करत म्हटले की, 'आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पहिली हॅट्ट्रिक घेणार्‍या आपल्या आकडेवारीत एकता बिष्टला बीसीसीआय विसरली. दीपक चाहर पहिला पुरुष क्रिकेटपटू आहे. पण एकता ही पहिली भारतीय खेळाडू आहे. जिने २०१२ मध्ये हा पराक्रम केला होता.'

दरम्यान, एकताने ऑक्टोबर २०१२ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेत खेळताना पहिला हॅट्ट्रिक साधली होती. तिने श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यात ४ षटकात गोलंदाजी करताना १६ धावा देत ३ गडी बाद केले होते. भारताने हा सामना नऊ गडी राखून जिंकला होता.

बीसीसीआयच्या त्या ट्विटवर नेटीझन्सच्या प्रतिक्रिया...

  • Dear @BCCI toda google karke hi post kar dete😂😂😂

    — Brizz📷~ તોફાની😂 (@brijeshbhusara) November 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Nov 12, 2019, 10:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.