नागपूर - भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील अखेरच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ३० धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने ३ सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. भारताच्या विजयानंतर नागपुरातील चाहत्यांनी एकच जल्लोष केला. चाहत्यांशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी...
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा रोहित शर्मा आणि शिखर धवन अपयशी ठरले. पण, लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकासह संघाला ५ बाद १७४ धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात बांगलादेशकडूनही दमदार खेळ झाला.
मोहम्मद मिथून व मोहम्मद नईम यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पण, दीपक चहर ३.२ षटकात गोलंदाजी करताना ७ धावा देत ६ गडी बाद केले. तर शिवम दुबेने ४ षटकात ३० धावा देत ३ गडी बाद केले. या दोघांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने सामन्यात कमबॅक केला.