सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला उद्या (गुरूवार ता. ७) पासून सुरूवात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज टी नटराजन याचा समावेश निश्चित असल्याचे संकेत मिळत आहेत. टी नटराजन याने एक ट्विट केले आहे. या ट्विटवरून हा अंदाज लावला जात आहे.
टी नटराजन याने आयपीएल २०२० मध्ये दमदार कामगिरी नोंदवली. यामुळे त्याची निवड ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नेट गोलंदाज म्हणून करण्यात आली. दौऱ्यादरम्यान, संघाचे प्रमुख गोलंदाज दुखापती झाले. यामुळे नटराजनला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. टी-२० मालिकेत त्याने ६ गडी बाद करत आपली उपयुक्तता सिद्ध केली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात उमेश यादव जखमी झाला. यामुळे उर्वरीत दोन कसोटी सामन्यासाठी टी नटराजन यांचा समावेश भारतीय संघात करण्यात आला. अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी नटराजनला सैनी आणि शार्दूल ठाकूर यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. असे असले तरी, तो तिसऱ्या कसोटीतून पदार्पण करणार असल्याचे संकेत आहेत.
टी नटराजनने त्याच्या अधिकृत ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात तो भारतीय कसोटी संघाची जर्सी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोला त्याने, भारतीय कसोटी संघाची जर्सी परिधान करणे हा क्षण माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मी पुढील आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार आहे. असे कॅप्शन दिले आहे. यामुळे त्याचा तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात समावेश निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
-
A proud moment to wear the white jersey 🇮🇳 Ready for the next set of challenges 👍🏽#TeamIndia @BCCI pic.twitter.com/TInWJ9rYpU
— Natarajan (@Natarajan_91) January 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A proud moment to wear the white jersey 🇮🇳 Ready for the next set of challenges 👍🏽#TeamIndia @BCCI pic.twitter.com/TInWJ9rYpU
— Natarajan (@Natarajan_91) January 5, 2021A proud moment to wear the white jersey 🇮🇳 Ready for the next set of challenges 👍🏽#TeamIndia @BCCI pic.twitter.com/TInWJ9rYpU
— Natarajan (@Natarajan_91) January 5, 2021
हेही वाचा - सिडनीत टीम इंडियाला विजयाची ४३ वर्षांपासून प्रतिक्षा, रहाणे 'ब्रिगेड'वर नजरा
हेही वाचा - NZ vs PAK: न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा डावाने पराभव; मालिकेत २-० ने निर्भेळ यश