मुंबई - भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. उभय संघात आज पहिला सामना मुंबईत खेळला जाणार आहे. या सामन्याआधी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा रेकॉर्ड वाचा, कोण कोणावर भारी पडले ते...
ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात नेहमीच वरचढ ठरला आहे. दोन्ही संघामध्ये आजघडीपर्यंत भारतात, ११ एकदिवसीय मालिका खेळवण्यात आल्या आहेत. यात भारताने ५ मालिकेत विजय मिळवला आहे. तर राहिलेल्या ६ मालिकेत ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया संघात आतापर्यंत १३७ एकदिवसीय सामने खेळली गेली आहेत. यात भारताने ५० सामन्यात विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलिया ७७ वेळा भारतावर वरचढ ठरली आहे. १० सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.
उभय संघांनी, भारतात ६१ एकदिवसीय सामने खेळली आहेत. यात ऑस्ट्रेलियाने २९ तर भारताने २७ सामने जिंकली आहेत.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुध्द अखेरची एकदिवसीय मालिका मार्च २०१९ मध्ये खेळली होती. भारताने ही मालिका ३-२ च्या फरकाने गमावली होती.
भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक -
- १४ जानेवारी - मुंबई
- १७ जानेवारी - राजकोट
- १९ जानेवारी - बंगळुरू
- ऑस्ट्रेलियाचा संघ -
- अॅरोन फिंच (कर्णधार), डी'आर्सी शॉर्ट, अॅश्टन अॅगर, अॅलेक्स करी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लाबुशेन, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅश्टन टर्नर, डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झम्पा.
- भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह.
हेही वाचा - Ind vs Aus : भारताला धूळ चारण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा खास सराव, जाणून घ्या...
हेही वाचा - मार्कस स्टॉयनिसची बिग बॅग लीगच्या इतिहासातील सर्वोच्च खेळी