ETV Bharat / sports

नटराजन, सैनी आणि शार्दुल यापैकी कोणाला संघात खेळताना पाहायला आवडेल, प्रशिक्षक काय म्हणाले...

author img

By

Published : Jan 6, 2021, 7:10 AM IST

नटराजन, सैनी आणि ठाकूर यांच्यातील कोणाला अंतिम संघात तुम्हाला पाहायला आवडेल असे प्रशिक्षक दिनेश लाड यांना विचारले असता त्यांनी शार्दुल ठाकूरच्या नावाला पसंती दिली.

ind-vs-aus-i-prefer-shardul-thakur-over-t-natarajan-and-navdeep-saini
नटराजन, सैनी आणि शार्दुल यापैकी कोणाला संघात खेळताना पाहायला आवडेल, प्रशिक्षक काय म्हणाले...

मुंबई - मी टी नटराजन आणि नवदीप सैनी यांच्याशिवाय शार्दुल ठाकूरला अंतिम संघात खेळताना पसंत करेन, असे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी सांगितलं. दिनेश लाड हे शार्दुल ठाकूर याचे लहानपणाचे प्रशिक्षक आहेत.

नटराजन, सैनी आणि ठाकूर यांच्यातील कोणाला अंतिम संघात तुम्हाला पाहायला आवडेल असे लाड यांना विचारले असता ते म्हणाले की, 'हा प्रश्न विचारून मला तर तुम्ही दुविधा मनस्थितीमध्ये टाकले. कारण शार्दुल हा माझा शिष्य आहे. यामुळे माझ्यासाठी ही निवड कठीण आहे. तरीदेखील मी शार्दुलच्या नावे पसंती देईन. त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये लाल चेंडूवर चांगले प्रदर्शन केले आहे. त्याने मागील तीन वर्षात रणजी करंडक स्पर्धेत आपली छाप सोडली आहे. यामुळे मी शार्दुलला भारताच्या अंतिम संघात पाहणे पसंत करेन.'

शार्दुल विकेटच्या दोन्ही बाजूने स्विंग करण्यात माहीर आहे. तसेच तो ताशी १४० किमी वेगाने गोलंदाजी करत आहे. जे की एका वेगवान गोलंदाजासाठी गरजेची आहे. एखाद्याकडे जर हे दोन्ही गुण असतील तर त्यांची शक्यता वाढते. याशिवाय शार्दुलकडे ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव आहे. त्याने भारत ए संघाकडून खेळताना चांगले प्रदर्शन केले आहे, असे देखील लाड यांनी सांगितलं.

अ‌ॅडलेड येथील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने दुसरा सामना जिंकत चार सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात विजयी लय कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ दोन्ही सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. उभय संघातील तिसरा सामना ७ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळला जाणार आहे.

हेही वाचा - रोहितने मिशेल स्टार्कपासून सावध राहिले पाहिजे - प्रशिक्षक दिनेश लाड

हेही वाचा - टीम इंडियाला धक्का, तिसऱ्या कसोटीआधी 'स्टार' खेळाडू मालिकेबाहेर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.