सिडनी : स्टिव्ह स्मिथचे शतक आणि रविंद्र जडेजाची प्रभावी फिरकी हे ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाचे वैशिष्ठ ठरले आहे. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३८ धावांत आटोपला. स्टिव्ह स्मिथ ने १३१ धावा केल्या. तो शेवट पर्यंत मैदानात होता. अखेर तो रन आऊट झाला. तर भारताकडून भारताकडून रविंद्र जाडेजानं प्रभावी मारा करताना चार महत्वाच्या विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले. सिराजला एक विकेट मिळाली.
स्मिथची प्रभावी खेळी
स्टिव्ह स्मिथ ने शतकी खेळी साकारत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. तर पदार्पण करणाऱ्या पुलोव्हस्कीने संयमी खेळी करत ६२ केल्या. शिवाय लाबुशनने ९१ धावांची बहुमोल खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३८ पर्यंत मजल मारता आली.
जाडेजाचा प्रभावी मारा
दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरूवात झाल्यानंतर फिरकीपटू रविंद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. लाबुशेन स्मिथची जोडी त्याने फोडली. लाबुशेन बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. स्मिथ मात्र एका बाजूने किल्ला लढवत होता. ग्रीन, मॅथ्यू वेड आणि पेन एका पोठोपाठ बाद झाले. जाडेजाने ६२ धावा देत ४ जणांना बाद केले. त्याला बुमरा आणि नवदिप सैनिची चांगली साथ मिळाली. त्यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर शिराजला एकाला बाद करण्यात यश आले.
मालिका बरोबरीत
चार कसोटी सामन्यांची मालिका सध्या एक- एक अशी बरोबरीत आहे. त्यामुळे तीसरी कसोटी जिंकत मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचा असणार आहे.
हेही वाचा -ऐतिहासिक : पुरूष कसोटी सामन्यात पहिल्यादांच महिला अंपायर