बंगळुरू - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा व अखेरच्या निर्णायक सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आज खेळवण्यात येणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत आहे. यामुळे दोनही संघ मालिका विजयाच्या उद्देशानं समोरासमोर भिडतील. दरम्यान, या सामन्यासाठी अमर-अकबर-अँथनी अंतिम संघात असतील. भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवने, भारताचे अमर अकबर अँथनी कोण आहेत, याचा खुलासा केला आहे.
भारतीय संघाने राजकोटच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघासमोर ३४० धावांचे आव्हान ठेवले. यात भारतीय सलामीवीर शिखर धवन, कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनी अर्धशतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाला भारताचे ३४१ धावांचे आव्हान झेपले नाही. त्यांचा संपूर्ण संघ ३०४ धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताने हा सामना ३६ धावांनी जिंकला. आता अंतिम निर्णायक सामन्याला बंगळुरूच्या मैदानात काही तासातच सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी कुलदीपने एक फोटो शेअर केला आहे. याला त्याने अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि ऋषी कपूर यांच्या अभिनयाने सजलेल्या, अमर अकबर अॅन्थनी या चित्रपटातील गाण्याचे बोल, कॅप्शन म्हणून दिले आहे.
-
Anhoni ko honi kar dein, honi ko anhoni
— Kuldeep yadav (@imkuldeep18) January 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Ek jagah jama hon teeno Amar Akbar Anthony🤝 pic.twitter.com/0WxUkHgjrs
">Anhoni ko honi kar dein, honi ko anhoni
— Kuldeep yadav (@imkuldeep18) January 18, 2020
Ek jagah jama hon teeno Amar Akbar Anthony🤝 pic.twitter.com/0WxUkHgjrsAnhoni ko honi kar dein, honi ko anhoni
— Kuldeep yadav (@imkuldeep18) January 18, 2020
Ek jagah jama hon teeno Amar Akbar Anthony🤝 pic.twitter.com/0WxUkHgjrs
कुलदीपने शेअर केलेल्या फोटोमध्ये शिखर धवन, केएल राहुल आणि तो स्वतः आहे. फोटोच्या क्रमानुसार धवन अमर, कुलदीप अकबर आणि राहुल अँथनी आहे. कुलदीपने या फोटोला, 'अनहोनी को होनी कर दें, होनी को अनहोनी। एक जगह जब जमा हो तीनों अमर अकबर अँथनी! ', असे कॅप्शन दिले आहे.
हेही वाचा - India vs Australia : आज बंगळुरूत निर्णायक लढत
हेही वाचा - पणजी: 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनाचा केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी घेतला आढावा