ETV Bharat / sports

AUS vs IND : उत्सुकता कसोटी मालिकेची; असे आहे वेळापत्रक - भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका न्यूज

एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली तर टी-२० मालिकेत भारतीय संघाने बाजी मारली. आता दोन्ही संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. जाणून घ्या उभय संघाच्या मालिकेचे वेळापत्रक...

ind v aus 2020 test series schedule
AUS vs IND : उत्सुकता कसोटी मालिकेची; असे आहे वेळापत्रक
author img

By

Published : Dec 10, 2020, 6:56 AM IST

मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्याची एकदिवसीय मालिका यजमान संघाने २-१ अशी जिंकली. यानंतर भारतीय संघाने टी-२० मालिका २-१ ने जिंकत एकदिवसीय मालिकेतील पराभवाची परतफेड केली. आता उभय संघात कसोटी मालिका होणार असून ही मालिका कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. जाणून घ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक...

असे आहे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अ‍ॅडलेड (दिवस-रात्र)
  • दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
  • तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ –सिडनी
  • चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गाबा

विराट चार पैकी फक्त एक कसोटी सामना खेळणार...

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या ३ सामन्यात कर्णधार विराट कोहली खेळणार नाही. कारण विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा गर्भवती आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट आई-बाबा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विराटने बीसीसीआयकडे पॅटनिर्टी लिव्हसाठी अर्ज केला होता. बीसीसीआयने विराटची रजा मंजूर केली आहे. त्यामुळे विराट पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतणार आहे.

भारताचा कसोटी संघ -

विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज.

हेही वाचा - टीम इंडियाला पराभवासोबत जबर धक्का!

हेही वाचा - तब्बल १४ वर्षांनंतर आफ्रिकेचा संघ करणार पाकिस्तान दौरा!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.