नवी दिल्ली - एकीकडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा जोर कायम असतानाच दुसरीकडे इंग्लंडमध्ये सुरु असलेली काऊंटी क्रिकेट स्पर्धाही जोरदार रंगते आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने या स्पर्धेमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर एका फलंदाजाला क्लीन बोल्ड केल्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता याच स्पर्धेतील अजून एक जबरदस्त व्हिडिओ समोर आला आहे.
-
This is incredible work! pic.twitter.com/i6SZ2i8dGk
— County Championship (@CountyChamp) June 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This is incredible work! pic.twitter.com/i6SZ2i8dGk
— County Championship (@CountyChamp) June 17, 2019This is incredible work! pic.twitter.com/i6SZ2i8dGk
— County Championship (@CountyChamp) June 17, 2019
या सामन्यात फिरकीपटूने चेंडू टाकला. फलंदाजाला तो चेंडू कळायच्या आत तो यष्टिरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये गेला. पण, यष्टिरक्षकालाही तो पकडता आला नाही. तरीही, जमिनीला स्पर्श करायच्या आतच यष्टिरक्षकाने हुशारीने त्या चेंडूला पायाने उडवले आणि सिली पॉईंटला उभ्या असलेल्या खेळाडूने क्षणाचाही विलंब न लावता तो झेल टिपला.
हा प्रकार पाहून तो फलंदाजही काही काळ आश्चर्यचकित झाला होता. क्रिकेटच्या इतिहासात याआधी अनेक भन्नाट झेल घेतलेले आहेत. आता या झेलचाही समावेश त्यात झाला आहे.