ETV Bharat / sports

आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या टेबलमध्ये टीम इंडियाची भरारी - भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका न्यूज

भारताच्या विजयानंतर आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या टेबलमध्ये मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघ न्यूझीलंडला मागे सारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

icc world test championship standings changes after india huge win in melbourne against australia
ICC विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या टेबलमध्ये टीम इंडियाची भरारी
author img

By

Published : Dec 29, 2020, 10:30 PM IST

दुबई - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा भारतीय संघाने जिंकला. ही मालिका आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत होत आहे. भारताच्या विजयानंतर आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या टेबलमध्ये मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघ न्यूझीलंडला मागे सारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

मेलबर्न कसोटीत भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या टेबलमध्ये बदल झाले. भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे नुकसान झाले. तरीदेखील ऑस्ट्रेलियाचा संघ क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे. पण न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्यांचे दुसरे स्थान भारताने काबीज केले आहे.

सद्यस्थितीमध्ये ऑस्ट्रेलिया संघाची विजयी सरासरी ७७ टक्के इतकी आहे. तर भारतीय संघाची विजयी सरासरी टक्केवारी ७२ इतकी आहे. न्यूझीलंड ६२ च्या सरासरीसह तिसऱ्या तर ६० च्या सरासरीसह इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा संघ ३९ च्या सरासरी टक्केवारीसह पाचव्या स्थानी आहे.

  • Gains for India in the ICC World Test Championship standings after a huge win in Melbourne 👀

    Battle for the top two spots heats up with New Zealand following closely behind!#WTC21 pic.twitter.com/XNzFWsJfba

    — ICC (@ICC) December 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याचा उद्या (बुधवार) अखेरचा दिवस आहे. या सामन्याच्या निकालानंतर टेबलमध्ये आणखी बदल होतील. दरम्यान, कोरोनामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अनेक सामने रद्द करण्यात आले आहेत. यामुळे गुणांऐवजी विजयाच्या सरासरीवरून निर्णय घेतला जाणार आहे.

हेही वाचा - SA vs SL : दक्षिण अफ्रिकेकडून श्रीलंकेचा डावाने पराभव; मालिकेत आघाडी

हेही वाचा - 'वेलडन अजिंक्य...' सचिन, विराट, अमिताभसह इतरांनी केलं टीम इंडियाचे कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.