नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान विरुध्दची २ सामन्याची कसोटी मालिकेत २-० ने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने मालिकेत निर्भेळ यशासह, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतही मोठी झेप घेतली आहे. पाक विरुध्दच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी होता. आता मालिका विजयासह ऑस्ट्रेलियाने दुसरे क्रमांक पटकावले आहे.
आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत पकड निर्माण करण्याच्या उद्देशात आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ याच उद्देशाने खेळ करताना दिसत आहे. इंग्लंड विरुध्दच्या ५ सामन्यांच्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाला फक्त दोन सामने जिंकता आले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ५६ गुणांची कमाई केली. मात्र, आता पाकिस्तान विरुध्दच्या २ सामन्याच्या कसोटी मालिकेत २-० ने विजय मिळवत १२० गुणांची कमाई केली.
सद्यस्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ १७६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी असून विराट सेनेने अद्याप एकही सामना गमवालेला नाही. भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ७ सामने खेळला असून या ७ ही सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. भारतीय संघ ३६० गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील टॉप-५ संघ -
- भारत - ३६० गुण
- ऑस्ट्रेलिया - १७६ गुण
- न्यूझीलंड - ६० गुण
- श्रीलंका - ६० गुण
- इंग्लंड - ५६ गुण
हेही वाचा - मनीष पांडेची नवी इनिंग.. 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत अडकला लग्नाच्या बेडीत
हेही वाचा - थरारक!..शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात कर्नाटक विजयी