दुबई - आयसीसीने महिला टी-२० क्रमवारी जाहीर केली असून यात भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधनाने मोठी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या तिरंगी मालिकेत स्मृतीने ५ सामन्यात दोन अर्धशतकांसह २१६ धावा केल्या. याचा फायदा तिला क्रमवारीत झाला असून ती ७३२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिरंगी मालिकेआधी स्मृती ७ व्या स्थानी होती. तर दुसरीकडे जेमिमा रॉड्रिग्जची क्रमवारीत ३ स्थानाने घसरण झाली असून ती सातव्या स्थानावर पोहोचली आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौर ९ व्या स्थानावर कायम आहे. तिने तिरंगी मालिकेत ११८धावा केल्या होत्या. या यादीत न्यूझीलंड संघाची सूझी बेट्स ७६५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
गोलंदाजीत राधा यादव आणि दीप्ती शर्मा संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत. तर फिरकीपटू पूनम यादव आणि अनुजा पाटील यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. त्या अनुक्रमे १२ आणि ३१ व्या स्थानावर आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाची मेगन स्कट ७४६ गुणांसह अव्वल आहे.
टॉप -५ फलंदाज -
खेळाडूचे नाव | देश | गुण |
---|---|---|
सूझी बेट्स | न्यूझीलंड | ७६५ |
सोफी डेविनी | न्यूझीलंड | ७४१ |
बेथ मूनी | ऑस्ट्रेलिया | ७३८ |
स्मृति मानधना | भारत | ७३२ |
मेग लेनिंग | ऑस्ट्रेलिया | ७१५ |
टॉप ५ गोलंदाज -
खेळाडूचे नाव | देश | गुण |
---|---|---|
मेगन स्कट | ऑस्ट्रेलिया | ७४६ |
शब्रिम इस्माईल | दक्षिण अफ्रीका | ७४३ |
सोफिया | इंग्लंड | ७३४ |
राधा यादव | भारत | ७२६ |
दीप्ति शर्मा | भारत | ७२६ |