दुबई - क्रिकेट सामन्यांमध्ये मैदानातील पंचाकडून 'नो बॉल' देताना अनेक वेळा चूका झाल्याने दिसून आले आहे. पंचाच्या निर्णयाने अनेकवेळा वाद झाल्याचेही उदाहरणे समोर आली. त्यामुळे यावर उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) एक निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या नव्या निर्णयानुसार, नो बॉलचा निर्णय तिसरे पंच देतील. प्रायोगीक तत्वावर याची सुरुवात करण्यात येणार आहे. पुढील सहा महिने हा प्रायोगिक तत्वावर चाचणी (ट्रायल) घेतली जाईल.
आयसीसी सामन्यादरम्यान, निर्णयावरुन होणाऱ्या चूका टाळण्यासाठी प्रयत्नशील असून अचूक निर्णयासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब सुरु केला आहे. या नुसार पायाचा नो बॉलचा निर्णय आता तिसरे पंच देताना आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान, हा प्रयोग २०१६ साली इंग्लंड विरुध्द पाकिस्तानच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान करण्यात आला होता.
एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, तिसरे पंच नो बॉलची तपासणी करतील आणि मैदानातील पंचांना याची माहिती देतील. तेव्हा मैदानातील पंच नो बॉल देतील आणि हा निर्णय गोलंदाजाला मान्य करावा लागणार आहे. म्हणजे गोलंदाजाने चेंडू टाकला आणि यावर तिसऱया पंचाचा निर्णय आल्यानंतर तो चेंडू ग्राह्य धरला जाईल.
दरम्यान २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या प्रयोगिक तत्वाच्या चाचणीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. या तंत्रज्ञानानुसार, जेव्हा गोलंदाजाचा पाय नो बॉलची रेषाकडे जात असतो, तो फुटेज स्लो मोशनमध्ये दाखवले जाते. जर पाय रेषेला स्पर्श झाला तर तो व्हिडिओ थांबतो. यामुळे तिसरे पंच त्या व्हिडिओवरुन निर्णय देत असत.