ETV Bharat / sports

Test Rankings : खराब कामगिरीनंतरही विराट दुसऱ्या स्थानी कायम, बुमराहला फायदा

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाची कामगिरी सुमार ठरली. कर्णधार विराट कोहली या मालिकेत संपूर्णपणे अपयशी ठरला. त्याला चार डावांमध्ये मिळून एकदाही २० ही धावसंख्या ओलांडता आलेली नाही. या खराब कामगिरीनंतरही विराटचे आयसीसी कसोटी क्रमवारीतले दुसरे स्थान कायम राहिले आहे.

author img

By

Published : Mar 3, 2020, 11:24 PM IST

icc test rankings kohli retains second spot bumrah rises four spots
Test Rankings : खराब कामगिरीनंतरही विराट दुसऱ्या स्थानी कायम, बुमराहला फायदा

दुबई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेनंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात न्यूझीलंडकडून व्हाईटवॉश मिळाल्यानंतरही भारतीय संघाने अव्वलस्थान कायम राखले आहे. तर खेळाडूंच्या क्रमवारीत विराट दुसऱ्या स्थानावर कायम आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अपेक्षित कामगिरी न करता चेतेश्वर पुजारा आणि जसप्रीत बुमराह यांची क्रमवारी सुधारली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाची कामगिरी सुमार ठरली. कर्णधार विराट कोहली या मालिकेत संपूर्णपणे अपयशी ठरला. त्याला चार डावांमध्ये मिळून एकदाही २० ही धावसंख्या ओलांडता आलेली नाही. या खराब कामगिरीनंतरही विराटचे आयसीसी कसोटी क्रमवारीतले दुसरे स्थान कायम राहिले आहे.

icc test rankings kohli retains second spot bumrah rises four spots
फलंदाजांची क्रमवारी...

चेतेश्वर पुजाराची २ स्थानाने सुधारणा झाली असून तो सातव्या स्थानावर पोहचला आहे. अजिंक्य रहाणेच्या स्थानात घसरण झाली असून तो नवव्या स्थानावर घसरला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या कामगिरीतही घसरण झालेली असून तो चौथ्या स्थानावर घसरला आहे.

गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सातव्या क्रमांकावर झेप घेतली असून, त्याचे स्थान चार अंकांनी वधारले आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत मालिकावीराचा किताब मिळवणारा न्यूझीलंडचा टीम साऊदीही चौथ्या स्थानावर पोहचला आहे. या दोघा व्यतिरीक्त ट्रेंट बोल्टनेही सर्वोत्तम दहा गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले असून तो नवव्या स्थानी पोहचला आहे.

हेही वाचा - आता बस्स झालं..! पराभवानंतर विराटला आली जाग, सुरू केली मोठ्या बदलाची तयारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.