दुबई - इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील ३ सामन्याची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. तिसरा सामना पाकिस्तानने ५ धावांनी जिंकला. या मालिकेनंतर आयसीसीने आज टी-२० क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे.
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वलस्थानी कायम आहे. तर पाकविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करणारा इंग्लंडचा डेव्हिड मलान टॉप-५ मध्ये पोहोचला आहे. या यादीत टॉप-१० मध्ये भारताचा के एल राहुल दुसऱ्या तर विराट कोहली दहाव्या स्थानावर आहे.
-
📈 @MRFWorldwide ICC T20I Rankings after the #ENGvPAK series:
— ICC (@ICC) September 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
👉 Babar Azam remains on top
👉 Dawid Malan enters top five
Updated rankings: https://t.co/H7CnAiw0YT pic.twitter.com/I48ApCdiTV
">📈 @MRFWorldwide ICC T20I Rankings after the #ENGvPAK series:
— ICC (@ICC) September 2, 2020
👉 Babar Azam remains on top
👉 Dawid Malan enters top five
Updated rankings: https://t.co/H7CnAiw0YT pic.twitter.com/I48ApCdiTV📈 @MRFWorldwide ICC T20I Rankings after the #ENGvPAK series:
— ICC (@ICC) September 2, 2020
👉 Babar Azam remains on top
👉 Dawid Malan enters top five
Updated rankings: https://t.co/H7CnAiw0YT pic.twitter.com/I48ApCdiTV
इंग्लंडच्या टॉम बॅटनला देखील क्रमवारीत फायदा झाला आहे. पावसामुळे वाया गेलेल्या पहिल्या सामन्यात बॅटनने ७१ धावांची खेळी केली होती. तो १५२ स्थानांची झेप घेत ४३ व्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने एक स्थान वर चढत २२ वे स्थान पटकावले आहे. मालिकावीर हाफीजने ६८ व्या स्थानावरून ४४ व्या स्थानावर उडी घेतली.
गोलंदाजांमध्ये फिरकीपटू शादाब खानने आठवे स्थान मिळवले आहे. त्याने आदिल रशिदला एका स्थानाने खाली ढकललं आहे. इंग्लंडचा टॉम करन आणि पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी हे दोघेही संयुक्तपणे २० व्या स्थानी आहेत. टॉम करनला ७ स्थानाचा फायदा झाला आहे. अष्टपैलूंच्या यादीत कोणताही उल्लेखनीय बदल झालेला नाही.
हेही वाचा - ENG v PAK : १९ वर्षीय हैदरचा विक्रम; असा कारनामा करणारा पहिला पाकिस्तानी
हेही वाचा - CSK माझा परिवार, धोनी माझ्यासाठी सर्व काही; रैनाने दिले IPL मध्ये परतण्याचे संकेत