दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी यूएईच्या दोन क्रिकेटपटूंना निलंबित केले आहे. मोहम्मद नावेद आणि शमीन अन्वर बट्ट अशी या दोन क्रिकेटपटूंची नावे आहेत.
आयसीसीने म्हटले आहे की, दोन्ही क्रिकेटपटू आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी कोड अंतर्गत ऑक्टोबर २०१९ मध्ये टी-२० विश्वचषक पात्रतेदरम्यान दोषी आढळले. यूएईत ही पात्रता स्पर्धा सुरू होण्यापूर्वी या दोघांवर निलंबनाची कारवाई झाली होती.
हेही वाचा - BREAKING..! सौरव गांगुली पुन्हा रुग्णालयात दाखल
आयसीसीने सांगितले की, हे क्रिकेटपटू निलंबित राहतील आणि त्यांना निर्बंधांचे पालन करणे आवश्यक असेल. २०१९ टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेदरम्यान दोघेही मॅच फिक्सिंगमध्ये गुंतले असल्याचे दिसून आले होते. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी संहिता कलम २.१.१ आणि २.४.४चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघेही दोषी आढळले आहेत.