दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संयुक्त अरब अमिरात क्रिकेट संघातील दोन खेळाडूंचं ८ वर्षांसाठी निलंबन केलं आहे. त्या दोघांवर २०१९ च्या टी-२० विश्वकरंडक क्वालीफायर सामन्यात फिक्सिंग केल्याचा आरोप आहे.
आयसीसीने संयुक्त अरब अमिरात संघाचे खेळाडू मोहम्मद नाविद आणि शायमान अन्वर बट यांचे निलंबन केलं आहे. या दोघांवर ८ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीने नाविद आणि बट या दोघांवर २०१९ च्या टी-२० विश्वकरंडक क्वालीफायर सामन्यात फिक्सिंग केल्याचा आरोप करत ही शिक्षा दिली आहे.
माजी कर्णधार नाविदने यूएईकडून ३९ एकदिवसीय, ३१ टी-२० सामने खेळली आहेत. तर बटने ४० एकदिवसीय आणि ३२ टी-२० सामन्यात यूएईचे प्रतिनिधित्व केलं आहे.
आयसीसीने या दोघांवर कलम २.१.१ आणि २.४.४ नुसार ही शिक्षा सुनावली आहे. २.१.१ हे कलम मॅच फिक्सिंग प्रकरणात सहमती दर्शवल्यानंतर लागू केलं जातं. तर २.४.४. हे कलम फिक्सिंगसाठी विचारणा झाल्याची माहिती दडवल्याने, लावला जातो.
हेही वाचा - भारत-इंग्लंड टी-२० मालिकेतील उर्वरित सामने प्रेक्षकांविना होणार
हेही वाचा - किशन-पंत मॅच विनर; ते भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतील