ETV Bharat / sports

'लिएंडर ४२ व्या वर्षी ग्रँडस्लॅम जिंकू शकतो, तर मी ३६ व्या वर्षी का नाही क्रिकेट खेळणार' - S Sreesanth

श्रीसंत पुढे म्हणाला की, क्रिकेटर आशीष नेहरा हा वयाच्या ३८ वर्षीपर्यंत खेळत होता. मी तर आता ३६ वर्षाचा आहे. माझा सराव सुरू आहे. मी मैदानावर लवकरच परतेन असा विश्वास व्यक्त केला.

श्रीसंत
author img

By

Published : Mar 15, 2019, 7:13 PM IST

दिल्ली - भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतवरील आजीवन बंदी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उठवली. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. श्रीसंत टेनिस खेळाडू लिएंडर पेसचे उदाहरण देताना म्हणाला की, जर लिएंडर पेससारखा महान खेळाडू वयाच्या ४२व्या वर्षी ग्रँड स्लॅम जिंकत असेल तर मी ही क्रिकेटमध्ये पुनरागमन करु शकतो.

प्रसार माध्यामांशी बोलताना श्रीसंतच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. तो म्हणाला की, माझी निवड करणे हे निवड समितीच्या हातात आहे. अजून क्रिकेट खूप आहे. जय माता दी. बऱ्याच खेळाडूंना दुखापत होते. त्यामुळे ते मैदानापासून दूर राहतात. मी ही दुखापत झाल्याने मैदानाबाहेर होते असे समजून चालत आहे.

श्रीसंत पुढे म्हणाला की, क्रिकेटर आशीष नेहरा हा वयाच्या ३८ वर्षीपर्यंत खेळत होता. मी तर आता ३६ वर्षाचा आहे. माझा सराव सुरू आहे. मी मैदानावर लवकरच परतेन असा विश्वास व्यक्त केला.

श्रीसंत गेल्या ६ वर्षापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. गेल्या काही वर्षापासून बीसीसीआयने सुनावलेल्या आजीवन बंदीविरोधात श्रीसंत सर्वोच्च न्यायालयात लढा देत होता. आज त्याच्या लढ्याला यश आले आहे.

Intro:Body:

IPL 2019 Bad News For KKR  Shivam Mavi And Kamlesh Nagarkoti Rules Out Of The Entire Seaso

केकेआरला झटका, कमलेश पाठोपाठ शिवम मावीही दुखापतीमुळे बाहेर

कोलकाता -  दोन वेळा आयपीएलच्या किताबावर मोहोर लावणाऱ्या केकेआरच्या संघासाठी वाईट बातमी आहे. आयपीएलच्या १२ व्या मौसमाला सुरुवात होण्यापूर्वी त्याचे महत्त्वाचे २ खेळाडूं बाहेर पडले आहेत. युवा गोलंदाज कमलेश नागरकोटी पाठोपाठ शिवम मावी दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

शिवम मावी पाठदुखीने त्रस्त आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये तो खेळू शकणार नाही. रणजी क्रिकेटमध्ये तो उत्तरप्रदेशच्या संघाचे नेतृत्त्व करतो. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी अजून सहा महिने लागू शकतात. 

शिवम आणि कमलेश हे दोघेही २०१८ च्या १९ वर्षाखालील विश्वचषक संघातील सदस्य आहेत. या विश्वचषकात त्यांनी आपल्या भेदक गोलंदाजीने अनेकांची मने जिंकली होती. कमलेश मागील वर्षीच्या आयपीएललादेखील मुकला होता. दोन्ही खेळाडूंना कमी वयात झालेली दुखापत हा केकेआरसोबतच भारतीय क्रिकेट बोर्डासाठीही चिंतेचा विषय असेल. 

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.