लाहोर - बॉलिवूड स्टार सलमान खानला आपल्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत पाहायला आवडेल, असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले आहे. अख्तर सलमानचा खूप मोठा चाहता आहे. त्याने सलमानचे अनेक वेळा कौतुक केले आहे. 2016मध्ये त्याने सलमानची दुबईमध्ये भेट घेतली होती. या भेटीबद्दल त्याने ट्विटही केले होते.
अख्तरने म्हटले, "जर कधी माझ्यावर चित्रपट आला तर मला सलमान खानला मुख्य भूमिकेत पाहायचे आहे." क्रिकेटपटूंवर येणारे बायोपिक चाहत्यांना आकर्षित करत असतात.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा बायोपिकही काही वर्षांपूर्वी आला होता. अलीकडेच 83 नावाचा चित्रपट भारताच्या 1983च्या विश्वकरंडक विजयावरही तयार झाला होता. मात्र, कोरोनामुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले आहे.