ETV Bharat / sports

'इरफान यांच्या ''त्या'' वेदना मी समजू शकतो..', युवराज भावुक

युवराजने ट्विटच्या माध्यमातून इरफान यांना श्रद्धाजली वाहिली. त्यात तो म्हणतो, 'मला तो प्रवास माहित आहे, मला त्या वेदना माहित आहेत आणि मला हेही माहित की तू अखेरपर्यंत संघर्ष केलास. काही जण यावर मात करतात, पण काही जणांना ते शक्य होत नाही. इरफान तू आता नक्कीच चांगल्या ठिकाणी असशील अशी मला आशा आहे.'

'I know the journey and the pain': Yuvraj Singh condoles demise of Irrfan Khan
Irrfan Khan Passed away : इरफान यांच्या 'त्या' वेदना मी समजू शकतो..., युवराज भावूक
author img

By

Published : Apr 29, 2020, 4:34 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचे कोलन इन्फेक्शनमुळे निधन झाले. काल (मंगळवार) अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफान यांना कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. इरफान यांच्या अचानक जाण्याने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींनी इरफानला ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, इरफान खान यांच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. युवराजलाही इरफानप्रमाणे कॅन्सरचा आजार झाला होता. पण युवीने या आजारावर मात करत दमदार पुनरागमन केले. इरफान मात्र, यात अपयशी ठरला.

युवराजने ट्विटच्या माध्यमातून इरफान यांना श्रद्धाजली वाहिली. त्यात तो म्हणतो, 'मला तो प्रवास माहित आहे, मला त्या वेदना माहित आहेत आणि मला हेही माहित आहे, की तू अखेरपर्यंत संघर्ष केलास. काही जण यावर मात करतात, पण काही जणांना ते शक्य होत नाही. इरफान तू आता नक्कीच चांगल्या ठिकाणी असशील, अशी मला आशा आहे.'

  • I know the journey I know the pain and I know he fought till the end some are lucky to survive some don’t I’m sure you are in a better place now Irfan Khan my condolence to your family. May his soul rip

    — yuvraj singh (@YUVSTRONG12) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इरफान गेल्या दोन वर्षांपासून न्यूरो इंडोक्राईन ट्युमरने आजारी होते. त्यांच्यावर उपचारानंतर ते अलिकडेच भारतात परतले होते. गेल्या काही दिवसापासून ते भारतात डॉक्टरांच्या निगराणीखाली वावरत होते. काल (मंगळवार) त्यांची अचानक तब्येत बिघडली.

देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने त्यांच्या दैनंदिन उपचारामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्याने अधिक दक्षता घेण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या उपचारादरम्यान त्यांना मृत्यूने गाठले.

इरफान यांना गेल्याच आठवड्यात मातृशोक झाला होता. शनिवारी त्यांची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. मात्र लॉकडाऊनमुळे इरफान आईच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकले नव्हते. हे शल्य त्यांच्या मनात कायम राहिले. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या आईचं अंत्यदर्शन घेतलं.

दरम्यान, युवीलाही २०११मध्ये कॅन्सर झाला होता. त्यानंतर योग्य उपचार आणि अथक परिश्रम घेत युवीने कॅन्सरवर मात केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.

हेही वाचा - युवीने माथेफिरुंच्या हल्ल्यात हात गमावलेल्या धाडसी पोलिसाला केला 'सॅल्यूट'

हेही वाचा - सचिन, विराटसह क्रिकेट विश्वातील खेळाडूंनी इरफान खान यांना वाहिली श्रद्धांजली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.