किंग्स्टन - आपल्या भेदक आणि वेगवान गोलंदाजीने जसप्रीत बुमराहने विंडीजविरुद्ध आपली पहिली हॅट्ट्रिक साजरी केली. परंतू या हॅट्ट्रिकचे सर्व श्रेय त्याने स्वत:कडे न घेता कर्णधार विराट कोहलीला दिले आहे.
बीसीसीआय टीव्हीवर कोहली आणि बुमराह या हॅट्ट्रिकबद्दल बोलत होते. त्यावेळी बुमराह म्हणाला, 'खरे सांगायचे झाले तर, मला माहित नव्हते आणि मी अपीलबाबत निश्चित नव्हतो. मला वाटले की चेंडू बॅटला लागून गेला आहे. मात्र शेवटी तो बाद झाला. त्यामुळे ही हॅट्ट्रिक विराटमुळे शक्य झाली.'
-
I owe my hat-trick to you – Bumrah tells @imVkohli @Jaspritbumrah93 became the third Indian to take a Test hat-trick. Hear it from the two men who made it possible 🗣️🗣️
— BCCI (@BCCI) September 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Full video here ▶️📹https://t.co/kZG6YOOepS - by @28anand #WIvIND pic.twitter.com/2PqCj57k8n
">I owe my hat-trick to you – Bumrah tells @imVkohli @Jaspritbumrah93 became the third Indian to take a Test hat-trick. Hear it from the two men who made it possible 🗣️🗣️
— BCCI (@BCCI) September 1, 2019
Full video here ▶️📹https://t.co/kZG6YOOepS - by @28anand #WIvIND pic.twitter.com/2PqCj57k8nI owe my hat-trick to you – Bumrah tells @imVkohli @Jaspritbumrah93 became the third Indian to take a Test hat-trick. Hear it from the two men who made it possible 🗣️🗣️
— BCCI (@BCCI) September 1, 2019
Full video here ▶️📹https://t.co/kZG6YOOepS - by @28anand #WIvIND pic.twitter.com/2PqCj57k8n
या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने हॅट्ट्रिक घेतली. त्यासोबतच बुमराहने विंडीजच्या डावाला खिंडार पाडत ६ विकेट्स पटकावल्या. बुमराहने हॅट्ट्रिकमधील तिसरी विकेट रोस्टन चेसची घेतली होती. सुरुवातीला पंच पॉल रेफेलने चेसला नाबाद दिले होते मात्र विराटने रिव्यू घेतला. या रिव्यूमध्ये चेस बाद असल्याचे आढळून आले. त्यामुळे बुमराहने विराटचे आभार मानले आहेत.
कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा जसप्रीत बुमराह हा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी हरभजन सिंह आणि इरफान पठान या दोघांच्या नावावर हा विक्रम होता. हरभजह सिंगने २००१ साली कोलकातामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तर, २००६ मध्ये कराची येथे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात इरफान पठानने हॅट-ट्रिक नोंदवली होती. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी जसप्रीत बुमराह याने किंग्सटन येथे वेस्टइंडीज विरूद्धच्या सामन्यात हा विक्रम रचला आहे.