ETV Bharat / sports

मराठमोळ्या अजिंक्यने केलं राज्य सरकारचं कौतुक, जाणून घ्या कारण

author img

By

Published : Apr 3, 2020, 1:40 PM IST

Updated : Apr 3, 2020, 2:17 PM IST

राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि एमपॉवर यांनी हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून मानसिक संतुलन कसे राखावे, याबाबत फ्री समुपदेशन केले जात आहे. या उपक्रमाचे भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने कौतुक केले आहे.

Highly appreciate efforts : Maharashtra Government, BMC & Mpower for creating a free helpline for mental wellbeing
मराठमोळ्या अजिंक्यने राज्य सरकारचं केलं कौतुक, जाणून घ्या कारण

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात २४ तास घरी असल्यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन बिघडत असल्याचे समोर आले. तेव्हा राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि एमपॉवर यांनी हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून मानसिक संतुलन कसे राखावे, याबाबत फ्री समुपदेशन केले जात आहे. या उपक्रमाचे भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने कौतुक केले आहे.

अजिंक्यने या विषयासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, 'लॉकडाऊनच्या काळात मानसिक स्वास्थ महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि एमपॉवर यांनी मानसिक स्वास्थाशी झगडणाऱ्या लोकांना मोफत समुपदेशनासाठी एक हेल्पलाईन सुरु केली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे.'

  • Mental health is also important during this lockdown. Highly appreciate the efforts of Maharashtra Government, BMC & Mpower for creating a free helpline to support people for their mental wellbeing. @AUThackeray @mybmc @NeerjaBirla
    📞 1800 120 820050

    — Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) April 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. आज लॉकडाऊनचा ९ वा दिवस आहे. अशात हाताला काम नसल्याने अनेकांचे मानसिक संतुलन बिघडत असल्याचे समोर आले. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. यामुळे अशा व्यक्तींसाठी राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि एमपॉवर यांनी हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. त्यात मानसिक संतुलन कसे राखावे याबाबत फ्री समुपदेशन केले जात आहे.

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा हा २ हजाराच्यावर गेला असून महाराष्ट्रातील संख्या ४५० पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, रहाणेने कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० लाखांची मदत दिली आहे.

धोनीला विराट संघात नको होता, निवड समिती सदस्याचा गौप्यस्फोट

शाहबाज नदीम धावला गरजूंच्या मदतीला, पुरवल्या जीवनावश्यक वस्तू

Last Updated : Apr 3, 2020, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.