मुंबई - युवराज सिंगची पत्नी आणि अभिनेत्री हेजल कीच ३२ वर्षांची झाली आहे. २८ फेब्रुवारीला हेजलने आपला वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी खासकरून युवराजने कोणतीही कसर सोडली नाही. त्यासाठी युवराजने एका पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी त्याचे जवळचे मित्र उपस्थित होते.
युवराजच्या या पार्टीमध्ये हरभजन सिंग, गीता बसरा, आशिष नेहरा, जहीर खान, अजित आगरकर यांसारखे खेळाडू उपस्थित होते. पत्नीच्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओ युवराजने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेयर केले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">