मुंबई - यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत हरमनप्रीत कौर भारताच्या १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबईमध्ये रविवारी या संघाची घोषणा करण्यात आली. चॅलेंजर करंडक स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या रिचा घोषला या संघात स्थान देण्यात आले आहे.
-
📢Squad Announcement📢@ImHarmanpreet will lead India's charge at @T20WorldCup #T20WorldCup #TeamIndia pic.twitter.com/QkpyypyJKc
— BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">📢Squad Announcement📢@ImHarmanpreet will lead India's charge at @T20WorldCup #T20WorldCup #TeamIndia pic.twitter.com/QkpyypyJKc
— BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2020📢Squad Announcement📢@ImHarmanpreet will lead India's charge at @T20WorldCup #T20WorldCup #TeamIndia pic.twitter.com/QkpyypyJKc
— BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2020
हेही वाचा - बुमराहला यंदाचा 'पॉली उम्रीगर' पुरस्कार, तर पूनम यादव ठरली सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू
या स्पर्धेच्या उद्घाटनादिवशी म्हणजेच २१ फेब्रुवारीला भारताचा पहिलाच सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी असणार आहे. ऑस्ट्रेलियाशिवाय भारतासोबत बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघांचा एका गटात समावेश आहे. प्रत्येक गटातील प्रथम दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. या स्पर्धेचा अंतिम सामना ८ मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर रंगणार आहे.
महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमीमाह रोड्रिग्ज, हर्लीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, रिचा घोष, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरूंधती रेड्डी.