नवी दिल्ली - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या राष्ट्रीय क्रिकेट असोसिएशन (एनसीए) येथे राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन प्रक्रियेस म्हणजेच रिहॅबिलिटेशन प्रोग्रामला प्रारंभ करणार आहे.
हेही वाचा - 'त्यावेळी मी स्वत:वर गोळी झाडून घेणार होतो', भारतीय क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध मुंबईत पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या सरावादरम्यान संघ व्यवस्थापनाने पांड्याला एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन प्रोग्राम पूर्ण करण्यास सांगितले होते. हा प्रोग्राम पूर्ण करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे संघ व्यवस्थापनाच्या एका व्यक्तीने सांगितले आहे.
दुखापतीतून सावरण्यासाठी पांड्या आणि बुमराह यांनी दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रजनीकांत शिवागणम यांची मदत मागितली होती. मात्र, सर्व खेळाडूंना एनसीएमध्ये पुनर्वसन करावे लागेल, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुलीने स्पष्ट केले. 'मी द्रविडला भेटलो, आम्ही एक प्रणाली तयार केली आहे. गोलंदाजांना एनसीएला जावे लागेल. कारण काहीही असो, आम्ही सर्वकाही समायोजित करू',असे गांगुलीने म्हटले होते.