नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटर कृणाल आणि हार्दिक या पांड्या बंधूंनी लॅम्बॉर्गिनी कार विकत घेतली आहे. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये पांड्या बंधूनी घेतलेली लॅम्बॉर्गिनी कार सर्वात महागडी गाडी आहे.
भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वात महागडी गाडी कर्णधार विराट कोहलीकडे असून त्याची किंमत ३ कोटी रुपये इतकी आहे. तर त्यानंतर माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याची गाडी प्रेम तर सर्वश्रृत आहे. त्याच्याकडे अनेक गाड्या आहेत. त्याने अलिकडे जीप शेरोकी ही गाडी खरेदी केली असून त्याची किंमत १ कोटीच्या घरात आहे. तर पांड्या बंधूंनी घेतलेल्या लॅम्बॉर्गिनी गाडीची किमत ३.७३ कोटी रुपये असल्याचे समजते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पांड्या बंधूनी घेतलेल्या गाडीत काय आहे स्पेशल -
लॅम्बॉर्गिनी ही गाडी हायटेक असून त्याचा इंटिरिअल खूपच भन्नाट आहे. या गाडीचे इंजिन केवळ ५१५ ते ५४४ किलोवॉट हॉर्सपॉवर इतके आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या या गाडीत ९० लिटर पेट्रोल साठवता येते. तर गाडीचे मायलेज ५-७ किलोमीटर प्रति लिटर आहे. विशेष म्हणजे, इतक्या महाग गाडीत केवळ दोघेच बसू शकतात.
हार्दिक आणि कृणाल या दोघाचे लॅम्बॉर्गिनी कार सोबतचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. भारतीय संघ सद्या वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर असून यामध्ये हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे.