ETV Bharat / sports

पांड्याचा कहर सुरूच... एकाच सामन्यात ठोकले २० षटकार! - हार्दिक पांड्या डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धा न्यूज

रिलायन्स-१ संघाकडून खेळणार्‍या हार्दिकने बीपीसीएल संघाविरूद्ध ५५ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि २० षटकारांच्या मदतीने १५८ धावांची नाबाद खेळी खेळली.

hardik pandya hit 20 sixes in dy patil t20 tournament
पांड्याचा कहर सुरूच...एका सामन्यात ठोकले २० षटकार!
author img

By

Published : Mar 6, 2020, 3:15 PM IST

नवी दिल्ली - टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेत 'जादुई' फॉर्म कायम राखला आहे. या स्पर्धेत पांड्याने दुसरे शतक ठोकले. इतकेच नव्हे तर, ही खेळी करताना त्याने २० उत्तुंग षटकार लगावत सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडले आहे.

हेही वाचा - विंडीजच्या डॅरेन सॅमीकडे पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षकपद

रिलायन्स-१ संघाकडून खेळणार्‍या हार्दिकने बीपीसीएल संघाविरूद्ध ५५ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि २० षटकारांच्या मदतीने १५८ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने एका षटकात सलग तीन षटकार लगावत आपल्या आक्रमक शैलीचे दर्शन घडवले.

या शानदार खेळीत हार्दिकचा स्ट्राईकरेट २८७.२७ असा होता. मुंबईत खेळल्या जाणाऱ्या १६ व्या डीवाय पाटील टी-२० स्पर्धेमध्ये हार्दिकने आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यात दोन शतकांचा समावेश आहे.

बँक ऑफ बडोदाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने २५ चेंडूत ३८ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने ३९ चेंडूत शतक ठोकत १०५ धावांची खेळी केली होती. या डावात त्याने १४ षटकार लगावले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.