नवी दिल्ली - टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग आजकाल सतत चर्चेत असतो. हरभजनने अचानक आयपीएल २०२०मधून नाव मागे घेत सर्वांना चकित केले. अनुभवी हरभजन सिंगने घरगुती कारण सांगून या स्पर्धेतून माघार घेतली.
आयपीएल सुरू होण्यापूर्वी हरभजनने एक ट्विट करून क्रिकेट चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. "आज क्रिकेट खूप चर्चेत आहे आणि मला नुकतेच काही कळले आहे, ज्यामुळे क्रिकेट पाहण्याचा दृष्टीकोन तुमचा कायमचा बदलेल. #cricketkakhulasa", असे हरभजनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
-
Cricket aaj kal kaafi news mein hai, aur abhi abhi mujhe aisa kuch pata chala hai that will change the way you look at cricket forever! #CricketKaKhulasa
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Cricket aaj kal kaafi news mein hai, aur abhi abhi mujhe aisa kuch pata chala hai that will change the way you look at cricket forever! #CricketKaKhulasa
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 12, 2020Cricket aaj kal kaafi news mein hai, aur abhi abhi mujhe aisa kuch pata chala hai that will change the way you look at cricket forever! #CricketKaKhulasa
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 12, 2020
हरभजनचे हे ट्विट कोणत्या विषयाच्या संदर्भात आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतू हरभजन क्रिकेटबद्दल नेमका काय मोठा खुलासा करणार याबद्दल चाहत्यांमध्ये नक्कीच उत्सुकता आहे. काही चाहत्यांनी त्याचे हे ट्विट मॅच फिक्सिंगशी संबंधित धक्कादायक खुलासे करण्याबाबत असेल, असा अनुमान लावला आहे.
हरभजन सिंग २०१६पासून भारतीय संघातून बाहेर आहे. भज्जीने टीम इंडियाकडून १०३ कसोटी सामन्यांमध्ये ४७१, २३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये २६९ आणि २८ टी-२०मध्ये २५ विकेट्स घेतल्या आहेत.