ETV Bharat / sports

Birthday Special : ३२ वर्षांचा झाला अजिंक्य रहाणे, जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी... - अजिंक्य रहाणेचे कुटुंब

अजिंक्य रहाणेचा आज वाढदिवस. तो आज ३२ वा वाढदिवस साजरा करीत आहे.

happy birthday ajinkya rahane know 10 facts about mumbai batsman
Birthday Special : ३२ वर्षांचा झाला अजिंक्य रहाणे, जाणून घ्या त्याच्याबद्दल खास गोष्टी...
author img

By

Published : Jun 6, 2020, 1:14 PM IST

मुंबई - टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा आज वाढवदिवस. तो आज ३२व्या वर्षात पदार्पण करत आहे. शांत, संयमी अशी ओळख असलेल्या अजिंक्यने फलंदाजी, क्षेत्ररक्षण यात भरीव कामगिरी केली आहे. तसेच त्याने काही सामन्यांत टीम इंडियाचे कर्णधारपदही भूषवले आहे. अशा हरहुन्नरी खेळाडूंबद्दल जाणून घ्या खास गोष्टी...

  • अजिंक्य रहाणेचा जन्म ६ जून १९८८ ला महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात झाला. त्याच्या वडिलांचे नाव मधुकर तर आईचे नाव सुजाता. त्याला एक भाऊ आणि एक बहीण आहे.
  • अजिंक्यला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. यामुळे त्याच्या वडिलांनी वयाच्या ७व्या वर्षीच डोबिंवलीच्या एका कोचिंग कॅम्पमध्ये त्याचे नाव नोंदविले. त्यावेळी रहाणे यांची परिस्थिची बेताचीच होती.
  • अजिंक्य रहाणे जेव्हा १७ वर्षांचा झाला तेव्हा भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी अजिंक्यला मदत केली. त्यांनी अजिंक्यला ट्रेनिंग दिली.
  • २००७मध्ये भारताचा अंडर-१९ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात अजिंक्यने दोन शतके झळकावली. महत्वाची बाब म्हणजे, त्यावेळी भारताच्या अंडर-१९ संघात विराट कोहली, ईशांत शर्मा, रवींद्र जडेजा हेही सदस्य होते.
  • न्यूझीलंड दौऱ्यातील कामगिरीच्या जोरावर अजिंक्यची निवड पाकिस्तानमध्ये होणाऱ्या मोहम्मद निसार ट्रॉफीसाठी झाली. अजिंक्यने त्यावेळी एकही प्रथम श्रेणी सामना खेळलेला नव्हता. त्याने वयाच्या १९ व्या वर्षी पाकिस्तानच्या कराचीमध्ये आपल्या करियरचा पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला.
  • अजिंक्यने पाकमध्ये खेळताना दमदार कामगिरी केली. त्याने पहिल्याच सामन्यात १४३ धावांची तडाखेबंद खेळी केली.
  • २००८मध्ये मुंबईकडून रणजी ट्रॉफी खेळताना, अजिंक्यने मुंबईला ३८वा रणजी चषक जिंकून दिला. या हंगामात त्याने १ हजार ८९ धावा केल्या.
  • अजिंक्यला २०११ मध्ये टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली. त्याची निवड इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी करण्यात आली होती.
  • अजिंक्य एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणूनही परिचित आहे. त्याने २०१५ साली श्रीलंका विरुद्ध गॉलच्या मैदानात खेळताना कसोटी सामन्यात ८ झेल टिपले होते. हा एक विक्रम आहे. एका मैदानात क्षेत्ररक्षकाने टिपलेले हे सर्वाधिक झेल आहेत.
  • याशिवाय आयपीएलमध्ये एका षटकात (सहा चेंडूत) सहा चौकार मारण्याचा विक्रम करणारा, अजिंक्य पहिला खेळाडू आहे. तर लॉर्ड्स मैदानात पहिला कसोटी सामना खेळताना, शतक झळकवणारा अजिंक्य चौथा क्रिकेटपटू आहे. याशिवाय आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सामनावीर ठरणारा अजिंक्य पहिला भारतीय खेळाडू आहे. तो विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून शतक करणारा पहिलाच फलंदाज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.