लंडन - इंग्लंड क्रिकेट काऊंटी क्लब ग्लॉस्टरशायरने अफगाणिस्तानचा लेगस्पिनर कॅस अहमद आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज अँड्र्यू टाय यांच्याशी केलेला करार रद्द केला आहे. यावर्षी टी-20 ब्लास्टसाठी अहमद आणि टाय ग्लॉस्टरशायर संघात सामील होणार होते. पंरतू, कोरोनामुळे टी-20 ब्लास्ट रद्द झाल्यानंतर क्लबला अनेक खेळाडूंसह करार रद्द करावे लागले.
यापूर्वी या क्लबने भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराचा करार रद्द केला होता. पुजाराला सहा काऊंटी सामने खेळायचे होते. इंग्लंडमधील सर्व प्रकारचे व्यावसायिक क्रिकेट कोरोनामुळे 1 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.
कोरोनाव्हायरस साथीच्या रोगामुळे काऊंटी चॅम्पियनशिप विभाग यापूर्वीच स्थगित करण्यात आले आहे. ही स्पर्धा 12 एप्रिलपासून सुरू होणार होती.