नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव जगभरासह भारतातही वेगाने होत आहे. मागील दोन दिवसांमध्ये देशभरात १०० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. अशात क्रीडा तसेच विविध क्षेत्रातून कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भाजपचा खासदार आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरही मदतीसाठी पुढे सरसावला आहे. त्याने या लढाईसाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, याआधी भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियानेही आपली ६ महिन्यांची पगार देण्याचे जाहीर केलं आहे.
गौतम गंभीरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग करत ट्विट केलं आहे. त्यात तो म्हणतो, 'शस्त्राशिवाय कोणतीही लढाई जिंकता येत नाही. कोरोनाविरुद्धच्या लढाईत, उपचार आणि साधनात कोणतीही कमी येऊ नये, यासाठी मी आपल्या खासदार निधीतून ५० लाख रुपयांची मदत रुग्णालयांना घोषित करत आहे.'
-
बिना हथियार जंग नहीं जीती जाती!
— Gautam Gambhir (@GautamGambhir) March 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Corona के इलाज और उपकरणों में कोई कमी ना हो इसलिए चाहता हूँ कि अस्पतालों को मेरे सांसद फण्ड से 50 लाख दिए जाएँ. @ArvindKejriwal
घर के अंदर रहें, सावधानी और सफ़ाई रखें और
सरकार का साथ दें. @narendramodi #IndiaFightsCorona pic.twitter.com/jS415AoTlo
">बिना हथियार जंग नहीं जीती जाती!
— Gautam Gambhir (@GautamGambhir) March 23, 2020
Corona के इलाज और उपकरणों में कोई कमी ना हो इसलिए चाहता हूँ कि अस्पतालों को मेरे सांसद फण्ड से 50 लाख दिए जाएँ. @ArvindKejriwal
घर के अंदर रहें, सावधानी और सफ़ाई रखें और
सरकार का साथ दें. @narendramodi #IndiaFightsCorona pic.twitter.com/jS415AoTloबिना हथियार जंग नहीं जीती जाती!
— Gautam Gambhir (@GautamGambhir) March 23, 2020
Corona के इलाज और उपकरणों में कोई कमी ना हो इसलिए चाहता हूँ कि अस्पतालों को मेरे सांसद फण्ड से 50 लाख दिए जाएँ. @ArvindKejriwal
घर के अंदर रहें, सावधानी और सफ़ाई रखें और
सरकार का साथ दें. @narendramodi #IndiaFightsCorona pic.twitter.com/jS415AoTlo
तसेच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅग करताना लिहलं आहे की, 'घरात राहा, सावधान राहा आणि स्वच्छता राखा. याकामी सरकारला साथ द्या, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, याआधी गौतम गंभीरने, संपूर्ण समाजासाठी तुम्ही धोका बनू नका. घरातच राहा. युद्ध नोकरी किंवा व्यापाराबरोबर नाही तर आयुष्याबरोबर आहे. ज्या व्यक्ती अत्यावश्यक सेवा देत आहेत त्यांना अडचण निर्माण होईल, असे कोणतेही काम तुम्ही करू नका. आता तुम्हाला एकांतावासामध्ये जायचे आहे की जेलमध्ये हे तुम्हीच ठरवा. नियमांचे पालन करा, अशा आशयाचे ट्विट केलं आहे.
-
मैं बजरंग पुनिया अपने छःमहीने का वेतन हरियाणा कैरोना रिलिफ फंड में सहयोग के लिये समर्पित करता हूँ ।जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🙏🏻🇮🇳🇮🇳 pic.twitter.com/65xYTD8ZA0
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) March 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मैं बजरंग पुनिया अपने छःमहीने का वेतन हरियाणा कैरोना रिलिफ फंड में सहयोग के लिये समर्पित करता हूँ ।जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🙏🏻🇮🇳🇮🇳 pic.twitter.com/65xYTD8ZA0
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) March 23, 2020मैं बजरंग पुनिया अपने छःमहीने का वेतन हरियाणा कैरोना रिलिफ फंड में सहयोग के लिये समर्पित करता हूँ ।जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🙏🏻🇮🇳🇮🇳 pic.twitter.com/65xYTD8ZA0
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) March 23, 2020
कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. देशात हा आकडा ४०० पार पोहचला आहे तर महाराष्ट्रात १०० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. कोरोनाचा वाढता प्रसार पाहून, महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्लीमध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - उद्धव ठाकरेच्या संचारबंदीचे क्रिकेटपटूने केलं स्वागत
हेही वाचा - ..अखेर टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकललं, ऑलिम्पिक समिती सदस्यानं दिली माहिती