कोलकाता - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आपल्या कसोटी पदार्पणाच्या सरावादम्यानचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. गांगुलीने 20 जून 1996 रोजी इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर पदार्पण केले होते.
पहिल्या कसोटी सामन्यात गांगुलीने 131 धावांची खेळी केली होती आणि या खेळीनंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. गांगुलीने बुधवारी इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला. या फोटोत तो सराव करताना दिसून येत आहे. ''आठवणी. 1996 मध्ये पदार्पणाच्या एक दिवस आधी लॉर्ड्स येथे प्रशिक्षण'', असे गांगुलीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
गांगुलीने भारतासाठी 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामने खेळले. तो भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. सध्या गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (कॅब) अध्यक्षही राहिला होता.