ETV Bharat / sports

भारत खेळणार डे-नाईट कसोटी सामना? ..बीसीसीआयचा 'बॉस' घेणार निर्णय

दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी भारताने एक पाऊल पुढे टाकावे, असे गांगुलीने याआधी स्पष्ट केले होते. त्यामुळे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, भारत खेळणार दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भारत खेळणार डे-नाईट कसोटी सामना? ..बीसीसीआयचा 'बॉस' घेणार निर्णय
author img

By

Published : Oct 16, 2019, 9:02 PM IST

कोलकाता - क्रिकेटमधील नामवंत असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड करण्यात आली. दादा आता २३ ऑक्टोबरला अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत दादाने झंझावाती निर्णय घेतले. आता या नव्या इनिंगमध्ये तो कोणत्या उपाययोजना करणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा - डेन्मार्क ओपन : भारताची 'फुलराणी' पहिल्याच फेरीच गारद

दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी भारताने एक पाऊल पुढे टाकावे, असे गांगुलीने याआधी स्पष्ट केले होते. त्यामुळे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, भारत दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याविषयासंबंधी गांगुलीला विचारले असता, त्याने आश्वासक उत्तर दिले. 'आता लगेच या विषयावर बोलणे घाईचे होईल. पण आम्ही यावर नक्की काम करू. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सामने दिवस-रात्र खेळवण्यात येणार नाही हे बोलणे चूकीचे ठरेल', असे मत गांगुलीने व्यक्त केले.

मागच्या वर्षी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाने वेस्ट इंडीजबरोबर डे-नाईट कसोटी सामना खेळण्यासाठी सहमती दर्शविली होती. मात्र, त्यानंतर 'आता संघ तयार नाही. संघाला १२ ते १८ महिने वेळ लागेल', असे प्रशासक समितीला (सीओए) पत्र लिहून कळवण्यात आले होते.

सौरव गांगुली एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी अध्यक्ष राहणार आहे. कारण तो मागील ५ वर्षांपासून बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार कोणताही अधिकारी सहा वर्ष कोणत्याही पदावर राहू शकतो.

Intro:Body:

sourav ganguly on day night test, ganguly decision on day night test, ganguly backs india for day night test

भारत खेळणार डे-नाईट कसोटी सामना? ..बीसीसीआयचा 'बॉस' घेणार निर्णय

कोलकाता - क्रिकेटमधील नामवंत असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड करण्यात आली. दादा आता २३ ऑक्टोबरला अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत दादाने झंझावाती निर्णय घेतले. आता या नव्या इनिंगमध्ये तो कोणत्या उपाययोजना करणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा -

दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी भारताने एक पाऊल पुढे टाकावे, असे गांगुलीने याआधी स्पष्ट केले होते. त्यामुळे अध्यक्षपद स्विकारल्यानंतर, भारत खेळणार दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याविषयासंबंधी गांगुलीला विचारले असता, त्याने आश्वासक उत्तर दिले. 'आता लगेच या विषयावर बोलणे घाईचे होईल. पण आम्ही यावर नक्की काम करू. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सामने दिवस-रात्र खेळवण्यात येणार नाही हे बोलणे चूकीचे ठरेल', असे मत गांगुलीने व्यक्त केले.

मागच्या वर्षी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाने वेस्ट इंडीजबरोबर डे-नाईट कसोटी सामना खेळण्यासाठी सहमती दर्शविली होती. मात्र, त्यानंतर 'आता संघ तयार नाही. संघाला १२ ते १८ महिने वेळ लागेल', असे प्रशासक समितीला (सीओए) पत्र लिहून कळवण्यात आले होते.

सौरव गांगुली एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी अध्यक्ष राहणार आहे. कारण तो मागील ५ वर्षांपासून बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार कोणताही अधिकारी सहा वर्ष कोणत्याही पदावर राहू शकतो.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.