मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कामगिरी आयपीएलच्या तेराव्या हंगामात फारशी चांगली झाली नाही. त्यांना प्ले ऑफ फेरीतून गाशा गुंडळावा लागला. यामुळे विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने विराटचा नवा पर्यायही समोर ठेवला आहे. त्याने रोहित शर्माकडे भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद द्यावे, असे म्हटले आहे.
-
🖐🏼 out of 🖐🏼 @IPL finals in the #MI Blue & Gold for RO 4️⃣5️⃣ 🏆💙#OneFamily #MumbaiIndians #MIChampion5 #Believe🖐🏼 @ImRo45 pic.twitter.com/1xU6y96IPe
— Mumbai Indians (@mipaltan) November 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🖐🏼 out of 🖐🏼 @IPL finals in the #MI Blue & Gold for RO 4️⃣5️⃣ 🏆💙#OneFamily #MumbaiIndians #MIChampion5 #Believe🖐🏼 @ImRo45 pic.twitter.com/1xU6y96IPe
— Mumbai Indians (@mipaltan) November 11, 2020🖐🏼 out of 🖐🏼 @IPL finals in the #MI Blue & Gold for RO 4️⃣5️⃣ 🏆💙#OneFamily #MumbaiIndians #MIChampion5 #Believe🖐🏼 @ImRo45 pic.twitter.com/1xU6y96IPe
— Mumbai Indians (@mipaltan) November 11, 2020
काय म्हणाला गंभीर...
जर रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला नाही, तर ते रोहितचे नाही, तर भारतीय क्रिकेट संघाचे नुकसान असेल. एक कर्णधार त्याच्या संघाइतकाच चांगला असावा लागतो. याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. परंतु कोण चांगला कर्णधार आणि कोण चांगला नाही, याबद्दल न्यायनिवाडा करण्यासाठी कोणते मापदंड आहेत? पॅरामीटर्स आणि बेंचमार्क समान असले पाहिजेत. रोहितच्या नेतृत्वात त्याच्या संघाने पाच आयपीएल विजेतेपदं पटकावली आहेत, असे गंभीरने सांगितले.
-
The only team and the captain to win 5⃣ IPL titles 🔝👌
— IndianPremierLeague (@IPL) November 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Congratulations to @mipaltan and @ImRo45 👊💪#Dream11IPL pic.twitter.com/rSb1uLjumz
">The only team and the captain to win 5⃣ IPL titles 🔝👌
— IndianPremierLeague (@IPL) November 10, 2020
Congratulations to @mipaltan and @ImRo45 👊💪#Dream11IPL pic.twitter.com/rSb1uLjumzThe only team and the captain to win 5⃣ IPL titles 🔝👌
— IndianPremierLeague (@IPL) November 10, 2020
Congratulations to @mipaltan and @ImRo45 👊💪#Dream11IPL pic.twitter.com/rSb1uLjumz
तर ते संघाचे नुकसान...
आपण धोनीला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानतो कारण, त्याच्या नेतृत्वात भारताने दोन विश्वकरंकड जिंकले आहेत. तसेच त्याच्या चेन्नई संघाने आयपीएलचे दोनवेळा विजेतेपद पटकावले आहे. तर रोहितने पाचवेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. तो आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याला टी-२० संघाचे नेतृत्व करायला मिळत नसेल तर ते भारतीय संघाचे नुकसान ठरेल. तो आपल्या नेतृत्वात संघाला विजय मिळवून देऊ शकतो, असेही गंभीर म्हणाला.
-
Happy that we gave people something to cheer for: @mipaltan' five-time IPL winning captain @ImRo45 👏🙌🏆#Dream11IPL #Final #MIvDC pic.twitter.com/l8aUTvtLaa
— IndianPremierLeague (@IPL) November 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Happy that we gave people something to cheer for: @mipaltan' five-time IPL winning captain @ImRo45 👏🙌🏆#Dream11IPL #Final #MIvDC pic.twitter.com/l8aUTvtLaa
— IndianPremierLeague (@IPL) November 10, 2020Happy that we gave people something to cheer for: @mipaltan' five-time IPL winning captain @ImRo45 👏🙌🏆#Dream11IPL #Final #MIvDC pic.twitter.com/l8aUTvtLaa
— IndianPremierLeague (@IPL) November 10, 2020
दरम्यान, रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. तर दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वात अद्याप बंगळुरूला एकही विजेतेपद पटकावता आलेले नाही.
हेही वाचा - IPLचे विजेतेपद पटकावल्यानंतर ठाकरे सरकारकडून मुंबई संघाचे कौतुक
हेही वाचा - IPL 2020 : मुंबईच्या पाचव्या विजेतेपदाबाबत सचिन म्हणाला, अफलातून विजय....