हैदराबाद - आयपीएलमध्ये रविवारी खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईवर १ धावेने सनसनाटी विजय मिळवत चौथ्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. आयपीएलच्या विजेत्या संघाला बक्षीस म्हणून चषक आणि २० कोटी तर उपविजेता संघास १२.५ कोटी रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले आहेत. जाणून घेऊयात आयपीएलच्या बाराव्या मोसमात कोणत्या खेळाडूला मिळाला कोणता पुरस्कार आणि त्याची रक्कम.
![चेन्नई सुपर किंग्ज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/cask-1_1205newsroom_1557635216_371.jpg)
- विजेता संघ - मुंबई इंडियन्स- 20 कोटी रुपये
- उपविजेता संघ - चेन्नई सुपर किंग्ज - 12.5 कोटी रुपये
- मोसमातील सर्वोत्तम झेल - कायरन पोलार्ड (मुंबई इंडियन्स) 10 लाख रुपये
- स्टायलिश क्रिकेटपटू - के एल राहुल (किंग्ज इलेव्हन पंजाब) 10 लाख रुपये
- गेम चेंजर ऑफ द सीजन - राहुल चाहर (मुंबई इंडियन्स) 10 लाख रुपये
- उदयोन्मुख खेळाडू - शुभमन गिल (कोलकाता नाइट रायडर्स) 10 लाख रुपये
- पर्पल कॅप - इम्रान ताहिर (चेन्नई सुपर किंग्ज ) 10 लाख रुपये
- ऑरेंज कॅप - डेव्हिड वॉर्नर (सनरायजर्स हैदराबाद) 10 लाख रुपये
- मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर - आंद्रे रसेल (कोलकाता नाइट रायडर्स) 10 लाख रुपये
- सुपर स्ट्राइकरचा ऑफ द सीजन - आंद्रे रसेल (कोलकाता नाइट रायडर्स) SUV गाडी आणि ट्रॉफी
- फेअर प्ले अवॉर्ड - सनरायजर्स हैदराबाद