ETV Bharat / sports

होय..! मी दोन वेळा सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिले - स्टिव्ह बकनर - Steve Bucknor on Sachin Tendulkar

स्टिव्ह बकनर एका रेडिओ कार्यक्रमादरम्यान म्हणाले, 'सचिनला मी दोनवेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे मला आठवते. कोणत्याही पंचासाठी चुकीचे निर्णय देणे ही चांगली बाब नाही. कुठलाही पंच जाणूनबुजून चुका करत नाही, त्या चुका होतात. त्यामुळे पंचांचे भविष्य उद्ध्वस्त होते. पण चुका या माणसाकडूनच होतात.'

Former umpire Steve Bucknor finally admits making blunders against Sachin Tendulkar
होय, मी दोन वेळा सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिले - स्टिव्ह बकनर
author img

By

Published : Jun 22, 2020, 6:43 AM IST

मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याने खोऱ्याने धावा जमवल्या, पण त्याला अनेकदा पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा त्याला शिकार व्हावे लागले आहे. सामन्यातील अगदी महत्त्वाच्या क्षणी सचिनला अनेकदा वादग्रस्तरीत्या बाद दिले गेल्याच्या घटना क्रिकेटप्रेमींच्या मनात अजूनही ताज्या असतील. सचिनला अशाप्रकारे बाद देणाऱ्या पंचांमध्ये स्टिव्ह बकनर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणून निवृत्ती स्वीकारल्यानंतर, बकनर यांनी सचिनला दोनवेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे मान्य केले आहे.

स्टिव्ह बकनर एका रेडिओ कार्यक्रमादरम्यान म्हणाले, 'सचिनला मी दोनवेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे मला आठवते. कोणत्याही पंचासाठी चुकीचे निर्णय देणे ही चांगली बाब नाही. कुठलाही पंच जाणूनबुजून चुका करत नाही, त्या चुका होतात. त्यामुळे पंचांचे भविष्य उद्ध्वस्त होते. पण चुका या माणसाकडूनच होतात.'

  • Felt great to be back in the nets with @vinodkambli349 during the @tendulkarmga lunch break!
    It sure took us back to our childhood days at Shivaji Park... 🏏

    Very few people know that Vinod & I have always been in the same team and never played against each other. #TMGA pic.twitter.com/DzlOm12SKa

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) May 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

२००३ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यातील ब्रिस्बेन कसोटीत मी सचिनला पायचित ठरवले होते. हा चेंडू स्टम्पवरून जात होता. त्यानंतर २००५ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या कोलकाता कसोटीत मी अब्दुल रझाकच्या गोलंदाजीवर सचिनला झेलबाद ठरवले होते. त्यावेळी बॅटजवळून गेल्यानंतर चेंडूची दिशा बदलली होती. मात्र त्याचा बॅटचा स्पर्श न होताच तो यष्टीरक्षकाजवळ गेला होता. तो सामना इडन गार्डनवर झाला होता. इडन गार्डन्सवर सामना असेल आणि भारतीय संघ बॅटींग करत असेल तर लाखभर प्रेक्षकांच्या आवाजात तुम्हाला काहीही ऐकू येत नाही. या चुकांबद्दल मलाही खेद आहे. मी माणूस आहे, चुका करणे हा प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे आणि त्या चुका मान्यही करता यायला हव्यात, असेही बकनर म्हणाले.

हेही वाचा - ''आयुष्यातील सर्वोत्तम क्षण'', गांगुलीच्या कसोटी पदार्पणाला 24 वर्षे पूर्ण

हेही वाचा - अजिंक्यने आई-बाबांचा फोटो शेअर करत दिल्या 'फादर्स डे'च्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.