ETV Bharat / sports

माजी रणजीपटूची गळफास घेऊन आत्महत्या

author img

By

Published : Jun 24, 2020, 1:28 PM IST

माजी रणजी खेळाडू आणि जोधपूर क्रिकेट संघाचे प्रशिक्षक नरेंद्र सिंह पवार यांनी आत्महत्या केली. जोधपूरच्या ओल्ड कँम्पमधील एका खोलीत त्यांनी गळफास घेतला.

Former Ranji cricket player Narendra Singh committed suicide
माजी रणजीपटूची गळफास घेऊन आत्महत्या

जोधपूर (राजस्थान) - माजी रणजी खेळाडू आणि जोधपूर क्रिकेट संघाचे प्रशिक्षक नरेंद्र सिंह पवार यांनी आत्महत्या केली. जोधपूरच्या ओल्ड कँम्पमधील एका खोलीत त्यांनी गळफास घेतला.

Former Ranji cricket player Narendra Singh committed suicide
मृत नरेंद्र सिंह पवार..

नरेंद्र सिंह पवार यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र हे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. ते सायंकाळी घरी आल्यानंतर व्यवस्थित बोलत नव्हते. तसेच ते घरी जेवतही नव्हते. त्यांना काही लोकांकडून धमकी दिली गेली असल्याचा आमचा संशय आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यात यावा.

माजी रणजीपटू नरेंद्र सिंह पवार यांची गळफास घेऊन आत्महत्या...

दरम्यान, नरेंद्र यांनी ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्या ठिकाणी त्याचा मोबाईल होता. पण त्यातील सर्व डेटा हा डिलीट करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे संशय आणखी वाढला आहे.

याप्रकरणी जोपर्यंत खूनाचा आरोप दाखल होत नाही, तोपर्यंत मथुरा दास माधुर रुग्णालयातून नरेंद्र यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. तसेच शवविच्छेदन करुन देणार नाही, असा पावित्रा पवार यांच्या कुटुंबीयांसह समाजातील बांधवानी घेतला आहे. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा - बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका स्थगित

हेही वाचा - पाकिस्तानची चिंता वाढली, आणखी 7 क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.