लाहोर - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसने त्याच्या कारकिर्दीतील दु:खद क्षणाची आठवण काढली आहे. 1992 च्या विश्वकरंडक स्पर्धेतून वकारला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले होते. हा क्षण सर्वात दु:खद असल्याचे वकारने सांगितले.
इम्रान खानच्या नेतृत्वात पाकिस्तानने 1992 ची विश्वकरंडक स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेबद्दल वकार म्हणाला, ''ती (स्पर्धा) माझ्यासाठी योग्य वेळ नव्हती. स्पर्धेपूर्वी मला पाठीची दुखापत झाली होती. मी संघासमवेत त्या दौर्यावर होतो. सराव सामन्यादरम्यान मला पाठीची दुखापत झाली आणि त्यानंतर मी विश्वकरंडक स्पर्धेत भाग घेऊ शकलो नाही."
वकार पुढे म्हणाला, "माझ्यासाठी ती बहुधा सर्वात वाईट वेळ होती. कारण त्यावेळी मी फॉर्मात होतो. मी शानदार गोलंदाजी करत होतो आणि संघात होतो. पाकिस्तान वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार होता. शेवटी पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली. परंतू त्या अभिमानास्पद घटनेतून बाहेर राहणे माझ्यासाठी फार आनंददायक नव्हते.''