वेलिंग्टन - कोरोना विषाणूने जगात थैमान घातलेले असताना, न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडचा फलंदाज डेनियल फ्लिनने क्रिकेट कारकिर्दीला रामराम केला आहे. ३४ वर्षीय फ्लिनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
-
Thanks Flynny! Congratulations to @ndcricket stalwart Daniel Flynn on his contribution to the game in New Zealand. #CricketNation https://t.co/H6m4ItkAqU
— BLACKCAPS (@BLACKCAPS) April 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thanks Flynny! Congratulations to @ndcricket stalwart Daniel Flynn on his contribution to the game in New Zealand. #CricketNation https://t.co/H6m4ItkAqU
— BLACKCAPS (@BLACKCAPS) April 2, 2020Thanks Flynny! Congratulations to @ndcricket stalwart Daniel Flynn on his contribution to the game in New Zealand. #CricketNation https://t.co/H6m4ItkAqU
— BLACKCAPS (@BLACKCAPS) April 2, 2020
फ्लिनने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या सहा वर्षांच्या कारकिर्दीत २४ कसोटी, २० एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यात न्यूझीलंड संघाचे नेतृत्व केले. पण त्याला आपली छाप सोडता आली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ५ अर्धशतके झळकावली आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ९५ आहे. ही खेळी त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध केली होती.
फ्लिनला २०१३ नंतर न्यूझीलंड संघामध्ये पुनरागमन करता आले नाही. पण, तो स्थानिक क्रिकेटमध्ये यशस्वी फलंदाज म्हणून परिचित आहे. त्यांची बॅट स्थानिक क्रिकेटमध्ये चांगलीच तळपली आहे.
नॉर्दन डिस्ट्रीक्ट संघाचे प्रतिनिधित करताना फ्लिनने १३५ प्रथम श्रेणी, ११३ लिस्ट ए आणि १०९ टी-२० सामने खेळली आहेत. त्यात त्याने ७८१५ धावा केल्या आहेत. यात २० शतकांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, फ्लिन नॉर्दन डिस्ट्रीक्टकडून सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज आहे.
सलामीवीर मयांकवर 'आचारी' बनण्याची वेळ, BCCI ने शेअर केला व्हिडिओ
लढा कोरोनाविरुद्धचा : गंभीरने ठेवला खासदारांसमोर आदर्श, दिला २ वर्षांचा पगार