ETV Bharat / sports

विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार - व्ही.व्ही.एस.लक्ष्मण - india

भुवनेश्वर कुमार आणि विजय शंकर चांगल्या फॉर्मात असून विश्वकरंडकासारख्या मोठ्या स्पर्धेत आपली सर्वोत्तम खेळी करण्यास ते सज्ज आहेत

व्ही.व्ही.एस.लक्ष्मण
author img

By

Published : Apr 16, 2019, 2:08 PM IST

हैदराबाद - भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारताच्या संघाची निवड झाल्यानंतर माजी दिग्गज फलंदाज व्ही.व्ही.एस लक्ष्मण म्हणाला की, विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील हा भारतीय संघ विश्वकरंडक स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

भारताचा संघ खूप संतुलित असून विश्वकरंडकाचा प्रमुख दावेदार आहे. मी भुवनेश्वर कुमार आणि विजय शंकरला सनरायजर्सला हैदराबादसाठी नेट्समध्ये सराव करताना पाहिले आहे. हे दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्मात असून विश्वकरंडकासारख्या मोठ्या स्पर्धेत आपली सर्वोत्तम खेळी करण्यास सज्ज आहेत.

इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मे पासून विश्वकरंडक स्पर्धेला सुरूवात होणार आहे.

विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

Intro:Body:

SPORTS2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.