ETV Bharat / sports

भारताच्या माजी 'वजनदार' खेळाडूकडे मुंबई संघाचे प्रशिक्षकपद - रमेश पोवार न्यूज

भारताकडून दोन कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळलेल्या ४२ वर्षीय रमेश पोवारने याआधी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली आहे. "माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवल्याबद्दल मी एमसीए आणि सीआयसीचे आभारी आहे", असे पोवारने एका वृत्तसंस्थेला सांगितले.

रमेश पोवार
रमेश पोवार
author img

By

Published : Feb 10, 2021, 6:40 AM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू रमेश पोवार याची मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मुंबई संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत संघाच्या खराब कामगिरीनंतर अमित पागनीस याने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या जागेवर रमेश पोवारची नियुक्ती करण्यात आली आहे.

रमेश पोवार
रमेश पोवार

हेही वाचा - चेन्नईतील पराभव : भारताचं टेन्शन वाढलं; WTCचा अंतिम सामना खेळण्यासाठी करावं लागेल 'हे' काम

भारताकडून २ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळलेल्या ४२ वर्षीय रमेश पोवारने याआधी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली आहे. "माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवल्याबद्दल मी एमसीए आणि सीआयसीचे आभारी आहे. मी संघात एक सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी आणि संघाला एक ब्रँड बनविण्यास उत्सुक आहे", असे पोवारने एका वृत्तसंस्थेला सांगितले.

प्रशिक्षकपदी नेमणूक झाल्यानंतर पोवार आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी संघाला प्रशिक्षण देईल. २० फेब्रुवारीपासून ही स्पर्धा रंगणार आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी मुंबईसह 'ड' गटात दिल्ली, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पुद्दुचेरी या संघांचा समावेश आहे. मुंबईचे साखळी गटातील सामने जयपूर येथे होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.