नवी दिल्ली - पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूसने पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे. त्याने गुरुवारी गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा अर्ज भरला.
![former bowler waqar younis apply for bowling coach in pakistan cricket team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/waqar-fb1_2308newsroom_1566559555_558.jpg)
पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, जेवढे अर्ज मागवले आहेत त्यापैकी वकार युनूसचे नाव सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. वकारने याआधी दोन वेळा पाकिस्तानच्या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले होते. पण, यावेळी त्याने संघाच्या गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे.
![former bowler waqar younis apply for bowling coach in pakistan cricket team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/ecak-nxxuaeqj1n_2308newsroom_1566562347_461.jpg)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष नजम सेठी यांच्या कार्यकाळात वकारने आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, मिकी आर्थर यांना संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आले होते. यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केल्यामुळे आर्थर यांना हटवण्यात आले होते. पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २६ ऑगस्ट पर्यंत आहे.