नवी दिल्ली - भारताच्या रविचंद्र अश्विनपेक्षा ऑस्ट्रेलियाचा नॅथन लिऑन चांगला फिरकीपटू असल्याचे मत, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉगने दिले आहे. ट्विटरवर एका चाहत्याला उत्तर देताना हॉगने आपले मत दिले. गेल्या काही वर्षांमध्ये लिऑनचा खेळ सुधारला असल्याचेही हॉग म्हणाला.
हॉग म्हणाला, “मला वाटते की गेल्या काही वर्षांत अश्विनपेक्षा लिऑन हा एक चांगला ऑफस्पिनर आहे. हे दोघे सतत आपला खेळ सुधारत आहेत. आणि त्यांच्या खेळावर ते समाधानी नसतात ही गोष्ट मला आवडते.”
परदेशात दोन्ही खेळाडूंची कामगिरी पाहिल्यानंतर हॉगने हे वक्तव्य केल्याचे समजते.