ETV Bharat / sports

टीम इंडियाच्या पाच खेळाडूंची रवानगी विलगीकरण कक्षात

कोविड-१९ प्रोटोकॉल उल्लंघन प्रकरणाची बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया चौकशी करत आहेत.

Five Indian players isolating
Five Indian players isolating
author img

By

Published : Jan 2, 2021, 6:34 PM IST

मेलबर्न - सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट टीमचे पाच खेळाडू एका हॉटेलमध्ये बसलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. हा व्हिडिओ शुक्रवारी भारतीय खेळाडू एका रेस्टॉरंटमध्ये बसल्यानंतर करण्यात आला होता.

भारतीय टीमचे खेळाडू रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी या खेळाडूंना संघाच्या अन्य खेळाडूंपासून वेगळे करण्यात आले आहे. हा पाच खेळाडू सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. ही माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी रात्री दिली.

कोविड-19 प्रोटोकॉलच्या नियम उल्लंघनाबाबत बीसीसीआय व क्रिकेट ऑस्ट्रेलिया चौकशी करत आहे. ट्विटर यूजर नवलदीप सिंह यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा खूपच व्हायरल झाला होता. सिंह यांनी या खेळाडूंचे बिलही भरले होते.

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात चार कसोटी सामन्याची मालिका खेळवली जात आहे. भारतीय खेळाडूंच्या या चुकीमुळे भारतीय संघाला मोठे नुकसान होऊ शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.