मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना आक्रमक फलंदाज तर आहेच, यासोबत ती हजरजबाबी असल्याचे दिसून आले. स्मृतीला तुझ्या होणाऱ्या साथीदारासाठी काय निकष आहेत, असे विचारले असता, तिने मजेशीर उत्तर दिले.
कोरोनामुळे सर्व क्रीडा स्पर्धा ठप्प आहेत. यामुळे खेळाडू आपापल्या घरीच कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत. या काळात बीसीसीआयच्या BCCI Women या अधिकृत ट्विटर हँडलने क्रिकेट चाहत्यांना स्मृतीला त्यांच्या मनातले प्रश्न विचारण्याची संधी दिली.
तेव्हा चाहत्यांनी या संधीचा लाभ घेत स्मृतीला क्रिकेटविषयी तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. एका चाहत्याने तर स्मृतीला तुझ्या होणाऱ्या साथीदारासाठी काय निकष आहेत, असा प्रश्न विचारला. यावर स्मृतीने मजेशीर उत्तर दिले.
ती म्हणाली, माझ्या दोन अटी आहे. यात पहिली, त्याने माझ्यावर प्रेम केलं पाहिजे आणि दुसरी म्हणजे, त्याने पहिली अट पूर्ण केली पाहिजे. या उत्तरावरून स्मृती हजरजबाबी असल्याचेही दिसून आले.
याशिवाय एक चाहत्याने तिला लव मॅरेज करणार, की अरेंज मॅरेज असे विचारले असता तिने सांगितलं 'लव-अरेंज्ड' करणार.
दरम्यान, नुकत्याच ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत स्मृती सहभागी झाली होती. मात्र, तिला या स्पर्धेत लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. अंतिम सामन्यात भारतीय संघाला यजमान ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा - लढा कोरोनाविरुद्धचा : मोदींनी विराट, सचिन, रोहित, गांगुलीसह क्रीडाविश्वाला मागितली मदत
हेही वाचा - VIDEO: ढल गया दिन, हो गई शाम..! पत्नीसोबत शिखर धवनचा डान्स